भारतात (India) लॉकडाउनमुळे अनेक जण आपल्या घरात कैद झाले आहे तर, अनेक घरापासून दूर राहावे लागत आहे. याच प्रमाणे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) अलिबाग (Alibaug) येथील आपल्या घरी क्वारंटाइनमध्ये आहेत. लॉकडाउनमध्ये तीन झोन तयार करण्यात आले आहेत-लाल, ऑरेंज आणि हिरवा. अलिबाग ऑरेंज झोनमध्ये आहे. भारत सरकारच्या लॉकडाऊन (Lockdown) नियमात सुलभता लागू झाल्यानंतर तो बुज शॉपमधून बीअर घेण्यासाठी जाणार असल्याचे माजी भारतीय अष्टपैलू खेळाडूने उघड केले. 4 मे रोजी दुकाने सुरू झाल्यापासून देशभरात दारूच्या दुकानांच्या बाहेर तळीरामांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. यावर शास्त्री म्हणाले की ते सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे सुनिश्चित करतील. शास्त्रीने क्वारंटाइन दरम्यान बिअर पिण्यासाठी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binny) आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांना दोन साथीदार म्हणून निवडले होते. (1985 ची भारतीय टीम देऊ शकते विराट कोहली याच्या सेनेला मायादित ओव्हरमध्ये देऊ शकते आव्हान: रवि शास्त्री)
“शिव (लक्ष्मण शिवरामकृष्णन), रॉजर (बिन्नी) या यादीमध्ये प्रथम असतील,” शास्त्री यांनी सोनी टेन पिट स्टॉपच्या नवीनतम भागात सांगितले. “आता लॉकडाउन असून मी रेड झोनच्या पलीकडे आहे आणि सध्या अलिबागमधील ऑरेंज झोनमध्ये आहे. मी आज रात्री एक बिअर घेणार आहे, मला खात्री आहे की तिथे काही दुकान उघडले जाईल. आणि जर मला माझ्याबरोबर बिअर घेण्यासाठी 2 जणांना घेऊन जायचे असेल तर मला खात्री आहे की रॉजर माझ्याबरोबर सामील झाला असता आणि सिवाही होईल,” शास्त्री पुढे म्हणाले.
या दरम्यान, शास्त्री यांनी खुलासा केला की 1985 ची भारतीय टीम विराट कोहली याच्या संघाला मायादित ओव्हरमध्ये माथीं आव्हान देऊ शकते. शास्त्री म्हणाले, "यात काही शंका नाही. तो (1985 संघ) कोणत्याही भारतीय मर्यादित षटकांच्या संघासमोर कडक आव्हान सादर करेल. ती 1985 ची संघ सध्याच्या संघालाही त्रास देईल."