टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवि शास्त्री राहणार? CoA समिती परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या विचारात नाही

त्यामुळे शास्त्री पुनरागमन करतील असं दिसत आहे.

रवी शास्त्री (Photo Credits: Getty Images)

भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI) सध्या टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. विश्वचषकनंतर बीसीसीआयने नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) याचा बीसीसीआयसोबतच करार वेस्ट इंडिज दौऱ्या (West Indies) नंतर संपणार आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकाची निवड करणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याशिवाय माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता गंतास्वामी (Shantha Rangaswamy) आहेत.

क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर IANS वृत्तसंस्थेला सांगितले की,

“भारतीय संघासाठी आम्ही परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या विचारात नाही आहोत. गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) सारख्या दिग्गज खेळाडूंनी या पदासाठी अर्ज केला आहे, अशा नावांचा आम्ही विचार करु मात्र भारतीय प्रशिक्षक हीच आमची पहिली पसंती राहील. रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे, मग बदल कशाला करायचा? त्यामुळे शास्त्री पुनरागमन करतील असं दिसत आहे.”

सूत्रांच्या माहितीनुसार कपिल देव यांच्या अंतर्गत असलेल्या समितीने सर्व अर्जदारांजी पडताळणी सुरु केली आहे. समिती शास्त्रींच्या कामगिरीवर खुश आहेत. आणि 15 ऑगस्ट दरम्यान टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळू शकतो. शास्त्रीऐवजी माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंह (Robin Singh), लालचंद राजपूत (Lalchand Rajput) यांनीही संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif