अर्ज केल्यास रवि शास्त्रींची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी बनून राहण्याची शक्यता, BCCI अधिकारी

बीसीसीआय अधिकाऱ्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार रवि शास्त्री, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुणआणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आपल्या पदावर कायम राहतील.

रवी शास्त्री (Photo Credits: Getty Images)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वकपच्या न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमीफायनल सामन्यात भारतीय संघा (Indian Team) च्या अपयशा नंतर भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI) ने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. त्यामुळे लवकरच प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांचे पद दुसऱ्याला देण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या जागांसाठी अर्ज मागवले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्याकडे असणार आहे. अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) व शांथा रंगास्वामी (Shantha Rangaswami) देखील या समितीचे सदस्य आहेत. (सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण नव्हे तर भारताचा वर्ल्डकप विजेता कर्णधार करणार मुख्य प्रशिक्षक आणि स्टाफची निवड)

शास्त्री यांच्यासह साहाय्यक स्टाफचा कार्यकाळ वर्ल्डकपपर्यंतचा होता. पण आगामी वेस्ट इंडिज दौरा लक्षात घेत त्यांना 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पण टीम इंडियाच्या या पदांसाठी अर्ज येण्याआधी आणि त्याच्या भेटीआधीच शास्त्री हे आपल्या पदावर कायम राहतील असे म्हटले जात आहे. बीसीसीआय अधिकाऱ्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार शास्त्री, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर (R Sridhar) देखील आपल्या पदावर कायम राहतील.

"रवि शास्त्री यांनी संघासाठी सर्व काही योग्य केले आहे," बीसीसीआय अधिकार्यांने एनडीटीव्ही ला सांगितले. "ते टेस्टमध्ये नंबर 1 झाले, इंग्लंडमध्ये पराभव होईपर्यंत ते वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होते. एक वाईट सामना कोचला खराब करत नाही. जर त्यांनी पुन्हा अर्ज केले तर त्याला प्राधान्य मिळेल."