'Coronavirus ला हरवून मानवतेचा वर्ल्ड कप जिंकूया', लॉकडाउनमध्ये टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांनी शेअर केला प्रेराणादायी संदेश (VIDEO)
त्यांनी याला 'मदर ऑफ ऑल वर्ल्ड कप' म्हटले. शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले जे कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात मोर्चाने नेतृत्व करत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढाईत लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत शास्त्रीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो लोकांना आपल्या घरात रहाण्याचे आवाहन करताना दिसत आहे. त्याचे कॅप्शनसुद्धा 'घरी राहा, सुरक्षित रहा' असे लिहिलेले आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रवि म्हणाले, "कोविड-19 (COVID-19) ने आपल्याला अशा परिस्थितीत उभे केले आहे जेथे आपण असहाय्य झालो आहोत. आपण ज्या आव्हानाला तोंड देत आहात ते सामान्य विश्वचषक नसून सर्व विश्वचषकांपेक्षा मोठे आहे." त्यांनी याला 'मदर ऑफ ऑल वर्ल्ड कप' म्हटले. शास्त्री पुढे म्हणाले, "वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावतो. त्यामुळे तुमच्याकडे जो नजर वटारून उभा आहे, तो साधा वर्ल्ड कप नाही. हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 11 खेळाडू नाही तर 130 कोटी लोकं संघर्ष करत आहेत." शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचेही कौतुक केले जे कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात मोर्चाने नेतृत्व करत आहे. (IPL 2020: लॉकडाउन वाढीनंतर BCCI कडून आयपीएल अनिश्चित काळासाठी रद्द; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा)
शास्त्री म्हणाले, "ही लढाई आपण जिंकू शकतो. परंतु यासाठी आपण सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. आपल्याकडे असे पंतप्रधान आहेत जे आघाडीतून पुढाकार घेत आहे. केंद्र सरकारचे आदेश असो वा राज्य सरकार, लोकांना त्याचे पालन करावे लागेल. दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे घरीच रहाणे आणि दुसरे म्हणजे सोशल डिस्टंसिंग. अर्थात हे सोपे नाही आहे, परंतु जिंकण्यासाठी आपल्याला त्रास सहन करावा लागेल."
कोरोना विषाणूमुळे भारतात (India) 350 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर दहा हजाराहून अधिक लोकं संक्रमित झाले आहे. या प्राणघातक रोगामुळे जगात क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पार गेली आहे. यापैकी 1, 26, 776 लोकांचा बळी गेला तर 4,84,781 जणं बरे झाले आहेत. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून 11 हजच्या वर पोहचली आहे. याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवले आहे.