Players Who Can Replace R Ashwin In India Test Team: टीम इंडियाच्या टेस्ट संघात रविचंद्रन अश्विनची जागा घेण्यासाठी 'हे' 3 फिरकीपटू आहेत मोठे दावेदार
अशा स्थितीत अश्विनच्या निवृत्तीनंतर संघाच्या फिरकी विभागाचे नेतृत्व करण्यासाठी चहल, रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर असे तीन प्रमुख दावेदार आहेत.
Players Who Can Replace R Ashwin In India Test Team: टीम इंडियाचा (Team India) अनुभवी कसोटी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कमालीचा फॉर्म दर्शवला आहे. अश्विनने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले की खेळातील सर्वात प्रदीर्घ स्वरूपात 618 विकेट घेतल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्तीचं जाहीर केलं होतं. अश्विनने खेळलेल्या 73 कसोटी सामन्यात आजवर 375 विकेट घेतल्या आहेत. मात्र, क्रिकेट विश्वात अश्विनचे काही वर्ष शिल्लक आहेत असे दिसत असताना टीम इंडिया चाहत्यांच्या मनात एकच प्रश असेल की भारताच्या या प्रमुख गोलंदाजाच्या निवृत्तीनंतर संघाच्या फिरकी विभागाचे नेतृत्व कोण करणार. तर याचे उत्तर म्हणजे भारतीय घरगुती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असे काही गोलंदाज आहेत जे अश्विनची कसोटी संघातील जबरदारी घेऊ शकतात. यामध्ये अंडर-19 फिरकी गोलंदाज रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर अशा खेळाडूंनी आपल्या खेळीने दावेदारी दर्शवली आहे. (IND vs AUS 3rd Test: सिडनी येथे टेस्ट डेब्यूसाठी नवदीप सैनीने ‘या’ गोष्टींमुळे शार्दूल ठाकूर-टी नटराजनविरुद्ध जिंकली रेस, वाचा सविस्तर
)
1. रवि बिश्नोई
आयपीएल 2020 दरम्यान अंडर-19 वर्ल्ड कपच्या या युवा स्पिनरने आपल्या गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केले. आयपीएलयानंतर फिरकी गोलंदाज म्हणून त्याचा भारतीय संघात समावेश करण्याचीही मागणी करण्यात आली होती. या युवा खेळाडूची प्रतिभा पाहता लंकारच त्याच्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे.
2. युजवेंद्र चहल
2016 मध्ये वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू करणाऱ्या चहलला अद्याप कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली नाही. चहलला टेस्ट क्रिकेटमध्ये संधी दिल्यास तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. संघाला गरज पडल्यास चहलकडे विकेट काढण्याचीही क्षमता आहे. शिवाय, चहल अचूक गोलंदाजी करत असून एक सिनिअर गोलंदाज म्हणूनही त्याला संघात प्राधान्य दिले जाऊ शकते.
3. कुलदीप यादव
2017 ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या कुलदीपने 6 टेस्ट मॅच खेळले ज्यात त्याने 3.51 च्या इकॉनॉमीने 24 विकेट घेतल्या आहेत. कुलदीप टीम इंडियामधील रविचंद्रन अश्विनचा उत्तराधिकारी मानला जातो. अश्विनच्या अनुपस्थितीत त्याचा सहसा टीम इंडियामध्ये समावेश होतो. यादवचे वय सध्या फक्त 26 असून जेव्हा अश्विन कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करेल, तेव्हा अनुभवी गोलंदाजांची उणीव भरून काढण्याची क्षमता कुलदीपकडे आहे.
याशिवाय, कसोटी संघात फिरकी गोलंदाज म्हणून स्थान मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेले कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर यांच्यासारखे स्टार फिरकीपटू देखील शर्यतीत आहेत. मात्र, अश्विनसारख्या अनुभवी आणि प्रभावी गोलंदाजाची जागा घेण्यासाठी या सर्वांना कसून मेहनत घ्यावी लागणार आहे.