Ranji Trophy Final 2018-19: रणजी ट्रॉफीत विदर्भ दुसऱ्यांदा चॅम्पियन

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये रंगलेल्या रणजी ट्राफीच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा विदर्भाने सौराष्ट्रावर मात करत विजेतपदाला गवसणी घातली आहे.

रणजी ट्रॉफीत विदर्भ संघाचा विजय (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये रंगलेल्या रणजी ट्राफीच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा विदर्भाने सौराष्ट्रावर मात करत विजेतपदाला गवसणी घातली आहे. विदर्भ क्रिकेट संघाने या चुरशीच्या लढतीत सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली. विदर्भाने पहिल्या डावात 312 धावा केल्या तर सौराष्ट्रने 307 धावा केल्या होत्या. त्यामुळे विदर्भाकडे 5 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात विदर्भाला 200 धावा करण्यात यश आले. त्यामुळे सौराष्ट्रपुढे 206 धावांचे लक्ष्य होते. मात्र हे लक्ष्य साध्य करणे सौराष्ट्रला शक्य झाले नाही. विदर्भाच्या गोलंदाजीसमोर अवघ्या 127 धावांत सौराष्ट्रला आपला डाव गुंडाळावा लागला.

विदर्भ संघातील आदित्य सरवटे याला 6 विकेट्स घेण्यात यश आले. तर सौराष्ट्र संघातील विश्वराज जडेजाने सर्वाधिक 52 धावा केल्या. या सामन्यात चेतेश्वर पुजाराला म्हणावे तसे यश मिळाले नाही. दोन्ही डावात केवळ 1 रन धावा करणाऱ्या पुजाराची विकेट घेण्यात आदित्य सरवटेला यश आले. सौराष्ट्रकडून धर्मेंद्रसिंग जडेजाने 96 धावांत 6 विकेट घेतल्या. याशिवाय कमलेश मकवानाने दोन आणि कर्णधार जयदेव उनादकट, चेतन सकारिया यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आले.

विदर्भाने दुसऱ्यांना रणजी ट्रॉफीचा मान पटकवला आहे. गेल्या वर्षी दिल्ली संघाला हरवून तर यंदा सौराष्ट्रवर मात करुन विदर्भाने जेतेपदाला गवसणी घातली.