Ranji Trophy 2024: रणजी ट्रॉफी विजेत्या मुंबई संघाला MCA कडून मोठे गिफ्ट

विजेतेपदाचा सामना जिंकण्यासाठी मुंबईने विदर्भाला 538 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते

रणजी ट्रॉफी 2024 स्पर्धेचा (Ranji Trophy 2024) अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) पार पडला. या सामन्यात मुंबई आणि विदर्भ (Mumbai Vs Vidharbha) हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबईने विदर्भाला जिंकण्यासाठी 532 धावांचे आव्हान दिले होते. विदर्भाचा डाव 368 वर आटोपला. यासह मुंबईने हा सामना 169 धावांनी जिंकला आहे. मुंबईने 42 व्या वेळेस रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दरम्यान या विजयानंतर मुंबई संघावर (Mumbai Team) बक्षिसांचा वर्षाव हा झाला आहे.  (हेही वाचा -  Ranji Trophy 2023-24 Winner: रणजी ट्रॉफीच्या जेतेपदावर मुंबई चं पुन्हा 8 वर्षांनी नाव; विदर्भ वर 169 धावांनी मात)

या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ सोडला तर उर्वरित चारही दिवसात मुंबई संघाचे वर्चस्व दिसून आले. विजेतेपदाचा सामना जिंकण्यासाठी मुंबईने विदर्भाला 538 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना विदर्भ संघाने आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली परंतु केवळ 368 धावांपर्यंतच मजल मारता आली.  मुंबईकडून या डावात तनुष कोटियनने 4 तर तुषार देशपांडे आणि मुशीर खानने 2-2 बळी घेतले. शम्स मुलानी आणि धवल कुलकर्णी यांनीही प्रत्येकी 1 बळी घेण्यात यश मिळविले.

या विजयानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक म्हणाले की, ' एमसीए अध्यक्ष अमोल काले आणि ॲपेक्स कमिटीने रणजी ट्रॉफीची प्राईज मनी दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून विजेत्या संघाला अतिरिक्त 5 कोटी रुपये दिले जाणार आहेत. हे वर्ष एमसीएसाठी खूप चांगलं राहिलं आहे. कारण या वर्षी एमसीएने 7 जेतेपदं पटकावली आहेत.