Raksha Bandhan 2020: एमएस धोनी-जयंती गुप्ता, विराट कोहली-भावना ते जसप्रीत बुमराह-जुहिका, टीम इंडिया खेळाडूंच्या बहिणी ज्यांनी नेहमी आपल्या भावांना दिली साथ (See Photos)

भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार खेळाडूंना बहिणीचे सुख लाभले आहे आणि त्यांच्याबरोबर ते एक उत्तम नातं शेअर करतात.

Indian Cricketers and Their Sisters (Photo Credits: Instagram/Twitter)

भाऊ-बहिणीचे नाती नेहमीच खास असते. नियमित भेटीगाठी होत नसली तरी सदैव जिवंत राहावे असं त्यांच्यातील नातं असत. रक्षाबंधन हा सण बहिण-भावामधील अतूट नात्यासह प्रेम, विश्वासाचा दिवस मानला जातो. या दिवशी बहिण भावाला मनगटावर राखी बांधून त्याचे औक्षण करते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणी प्रार्थना करतात. दोघेही एकमेकांना सर्व प्रकारच्या शत्रूंपासून संरक्षण देण्याचे वचन देतात. रक्षाबंधनाची (Raksha Bandhan) परंपरा सर्व सीमारेषा ओलांडून देशभरातील प्रत्येकाद्वारे साजरी केली जाते. 3 ऑगस्ट रोजी भारतात रक्षाबंधन साजरा केला जाईल. बहीण-भावाच्या प्रेमाच्या या सणानिमित्त आपण जाणून घेऊया काही अव्वल भारतीय क्रिकेटर्सच्या (Indian Cricketers) भावा-बहिणीच्या बंधाबाबत. भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार खेळाडूंना बहिणीचे सुख लाभले आहे आणि त्यांच्याबरोबर ते एक उत्तम नातं शेअर करतात. ते क्रिकेट मैदानावर मैलांच्या अंतरावर देशाचे प्रतिनिधित्व करीत असूनही त्यांच्या बहिणी आणि कुटूंबासह रक्षाबंधन साजरा करणे निश्चित करतात. (Raksha Bandhan 2020 Muhurat: भद्र काळात राखी बांधणं का टाळलं जातं? जाणून घ्या रक्षाबंधनाचा भद्र, राहू काळ कोणता आणि शुभ मुहूर्त काय?)

मागील वर्षाच्या विपरीत यावर्षी सर्व क्रिकेटर्स घरी बहिणींसोबत हा सण साजरा करतील आणि पुन्हा एकदा त्यांच्या भावंडांचे प्रेम आणि मैत्री बळकट करतील. रक्षाबंधन 2020 च्या निमित्ताने काही बड्या भारतीय क्रिकेटपटूंच्या बहिणींबाबत जाणून घ्या:

विराट कोहली आणि भावना

भारतीय कर्णधाराने स्वत:चा आणि बहिण भावना धिंग्रा यांचे गतवर्षी त्यांच्या बालपणाचा सुंदर फोटो या निमित्ताने शेअर केला होता. यावर्षीही ते नक्की हा सण साजरा करतील.

 

View this post on Instagram

 

Happy siblings day 🥰

A post shared by Bhawna Kohli Dhingra (@bhawna_kohli_dhingra) on

शिखर धवन आणि श्रेष्ठा

भारतीय क्रिकेटच्या गब्बरला श्रेष्ठा नावाची एक गोड बहीण आहे आणि ते एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि दरवर्षी रक्षाबंधन साजरा करण्याची खात्री करतात.

 

View this post on Instagram

 

Happy birthday to my sister Shreshtha, who's played such an important role in my life and continues to do ❤️ Sending you lots of love and wishes 🤗

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

एमएस धोनी आणि जयंती

जयंती ही महेंद्र सिंह धोनीची मोठी बहीण आहे आणि धोनीप्रमाणेच ती देखील प्रसिद्धीपासून दूर आहे. ती एक इंग्रजी शिक्षिका आहे.

एमएस धोनी त्याच्या बहिणी जयंतीसह (पांढरा कुर्ता) (Photo Credits: Twitter)

जसप्रीत बुमराह आणि जुहिका

बुमराह त्याची बहीण जुहिकावर जीवापाड प्रेम करतो आणि बर्‍याचदा त्यांच्या प्रेमळ भावा-बहिणींच्या नात्याची फोटो देखील शेअर करतो. गेल्या महिन्यात तिच्या वाढदिवशी त्याने एक भावनिक पत्रही लिहिले होते.

 

View this post on Instagram

 

You have a way of brightening everyone’s world with your warm smile & beautiful soul. With each passing year, I hope you shine brighter & all your wishes come true. Happy birthday Juhika. #sistersbirthday🎂

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1) on

दीपक चाहर, राहुल चाहर आणि मालती

भारतीय क्रिकेटमधील दोन उगवत्या तारे दीपक आणि राहुल चाहर आपली बहिणी मालतीवर खूप प्रेम करतात. ती देखील क्रिकेटबाबत अपडेतेट राहिले आणि स्वत: आपल्या क्रिकेट स्टार भावांच्या कर्तृत्वाबाबत माहिती ठेवते.

 

View this post on Instagram

 

The posers💚 Who did it better?👻 #siblings #love #family

A post shared by Malti Chahar(Meenu) (@maltichahar) on

सचिन तेंडुलकर आणि सविता

सविता ही सचिनची सावत्र बहीण आहे, पण त्यांचे प्रेम इतर भावंडांइतकेच दृढ आहे. तिने मास्टर ब्लास्टर्सच्या क्रिकेट कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि तो देखील तिच्यावर खूप प्रेम करतो. सचिनला त्याची पहिली बॅटही सविताने भेट दिली होती असे म्हटले जाते.

वीरेंद्र सेहवाग आणि मंजू आणि अंजू

बरीच वर्षे आपल्या चाहत्यांप्रमाणेच सेहवाग आपल्या फॅमिलीचेही मनोरंजन करत राहतो आणि सोशल मीडियावर त्यांचे आनंदी किस्से शेअर करतो.

श्रेयस अय्यर आणि नताशा

भाऊ-बहिणीची ही जोडी घरी त्यांच्या एकत्र वेळात मजा करत आहेत आणि काही मजेदार व्हिडिओ ऑनलाईनही शेअर करतात.

 

View this post on Instagram

 

Always here as your protector (and bully), sister! 😉 Happy Raksha Bandhan @shresta_04

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41) on

आमच्याकडून सर्व वाचकांना रक्षाबंधन 2020 च्या हार्दिक शुभेच्छा! व्यस्त दौरा आणि व्यस्त वेळापत्रक नसल्याने आवडते क्रिकेटपटू आणि त्यांच्या बहिणी या वेळी नक्कीच एकत्र आनंदी वेळ घालवतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif