IND vs PAK T20 WC 2022 Weather Updates: भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचा धोका? मेलबर्नमधील हवामान परिस्थिती जाणून घ्या

ब्रिस्बेनमधील काही सराव सामनेही पावसामुळे अजिबात होऊ शकले नाहीत. तर होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या पात्रता सामन्यांनाही पावसाचा फटका बसला.

MCG (Photo Credit - Twitter)

आज (23 ऑक्टोबर) क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा दिवस आहे. कारण टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. मात्र दरम्यान, काही दिवसांपासून पावसाचा धोका निर्माण झाला आहे. ब्रिस्बेनमधील काही सराव सामनेही पावसामुळे अजिबात होऊ शकले नाहीत. तर होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या पात्रता सामन्यांनाही पावसाचा फटका बसला. तसेच  मेलबर्नमध्येही काही दिवसांपासून पाऊस पडत आहे.

मात्र आजच्या दिवसाचे बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांपासून येथे पाऊस पडला नाही. ढगांनी आकाश पूर्णपणे व्यापले असले तरी. दुपारच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. पण हा पाऊस इतका धोकादायक नसेल की त्यामुळे सामना थांबू शकेल. थोड्याशा पावसाचा परिणाम सामन्यावर होऊ शकतो. Accuweather वर विश्वास ठेवला तर, रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता 40 टक्क्यांपर्यंत असेल. आकाश 92% पर्यंत ढगाळ राहील. तर वाऱ्यांचा वेगही 45 किमी/तास राहील. (हे देखील वाचा: IND vs PAK T20 WC 2022 Live Streaming Online: टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या कधी-कुठं पाहणार सामना)

रविवारी मेलबर्नमध्ये कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की मेलबर्नमध्ये शनिवारी सकाळपासून पाऊस झालेला नाही आणि आज हा सामना होण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यानही ढगाळ वातावरण असेल, त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता अधिक आहे.