T20 वर्ल्ड कप 2021 नंतर पुन्हा सुरु होणार टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची शोध, Ravi Shastri यांना भारताचे ‘हे’ 3 माजी दिग्गज करू शकतात रिप्लेस

शास्त्री यांना 2019 वर्ल्ड कपनंतर प्रशिक्षकपदी दोन वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. अशास्थितीत भारतीय संघाचे 3 दिग्गज टीम इंडियाचे पुढील मुख्य प्रशिक्षक बनू शकतात.

टीम इंडिया आणि रवि शास्त्री (Photo Credit: PTI, Instagram)

Ravi Shastri Head-Coach Replacement: भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि विद्यमान प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) गेल्या काही वर्षात शानदार कामगिरी बजावली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकण्यापासून इंग्लंड येथे आयोजित 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. तथापि यंदा वर्षअखेरीस आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेनंतर शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार असल्याने बोर्डाला पुन्हा एकदा त्यांची जागा भरून काढण्यासाठी दुसऱ्या प्रशिक्षकाची शोध घ्यावी लागणार आहे. 2017 मध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या शास्त्री यांना 2019 मध्ये प्रशिक्षकपदी दोन वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. अशास्थितीत भारतीय संघाचे (Indian Team) 3 दिग्गज टीम इंडियाचे पुढील मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. (T20 World Cup 2021 साठी भारतीय संघातून Yuzvendra Chahal याला डच्चू दिल्यास हे 3 खेळाडू घेऊ शकतात फिरकीपटूचे स्थान)

राहुल द्रविड (Rahul Dravid)

2016 मध्ये द्रविडला बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी संपर्क साधला होता परंतु माजी भारतीय कर्णधार त्याऐवजी भारतीय अंडर-19 आणि भारत A संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारून आगामी क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. द्रविडचा भारतीय अंडर19/A संघाचा प्रशिक्षक म्हणून कामगिरी हा भारतीय क्रिकेटसाठी वरदान ठरला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यावर द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी दुसर्‍या भारतीय संघाचे नेतृत्व करेल आणि शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर माजी भारतीय कर्णधार अखेरीस वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षक पदासाठी मुख्य दावेदार ठरू शकतात.

वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)

सेहवाग 2017 मध्ये टीम इंडियाच्या कोचिंग पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी एक होता. सेहवागने शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज सादर केला होता पण सध्याचे प्रशिक्षक शास्त्रीनकडून त्याला पराभव पत्करावा लागला. यापूर्वी आयपीएल फ्रेंचायजी किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रशिक्षक करण्याचा अनुभव सेहवागला आहे. या अनुभवातून त्याला भारतीय कोचिंगची नोकरी मिळण्यास मदत होईल का याकडे नक्कीच सर्वांचे लक्ष लागून असेल.

व्हीव्हीस लक्ष्मण (VVS Laxman)

आणखी एक माजी भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू जे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा दावेदार बनू शकतात ते म्हणजे स्टायलिश फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण. लक्ष्मण हा भारतीय क्रिकेट विश्वात एक अत्यंत प्रतिष्ठित क्रिकेटपटू आहे आणि वरील पद मिळवण्यासाठी एक उपयुक्त दावेदार ठरू शकतात. या माजी भारतीय क्रिकेटपटूने गेल्या काही वर्षांपासून आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा सल्लागार म्हणून काम केले आहे आणि संधी मिळाल्यास ते पदासाठी अर्ज करतात की  नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif