भारताच्या श्रीलंका दौर्‍यावर Rahul Dravid करणार संघाचे प्रशिक्षण, NCA सदस्य बजावू शकतात ‘ही’ भूमिका

असल्यामुळे बीसीसीआय श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. Cricbuzz च्या वृत्तानुसार या संकल्पनेवर विचार सुरू असल्याची पुष्टी केली जात आहे.

राहुल द्रविड (Photo Credit: Getty)

India Tour of Sri Lanka 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघ  (Indian Team) श्रीलंका (Sri Lanka) दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली. या दौर्‍यावर भारतीय संघ 3 सामन्यांची टी 20 आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी भारत आपल्या टीम ‘बी’ला श्रीलंकेत पाठवू शकतो, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर भारताची मुख्य संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तिथेच राहणार आहे. मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि इतर सहाय्यक कर्मचारी मुख्य भारतीय संघासह इंग्लंडमध्ये राहणार असल्यामुळे बीसीसीआय (BCCI) श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. Cricbuzz च्या वृत्तानुसार या संकल्पनेवर विचार सुरू असल्याची पुष्टी केली जात आहे आणि द्रविड खेळाडूंसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (National Cricket Academy) मधील काही सहाय्यक कर्मचार्‍यांसह श्रीलंका येथे येण्याची दाट शक्यता आहे. (IND vs SL 2021 Series: श्रीलंका दौऱ्यावर जाणार टीम इंडियाचे नवे भीडू, कोणाला मिळणार नेतृत्वाची धुरा; पहा संभाव्य भारतीय संघ)

इंग्लंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि 5 कसोटी सामन्यासाठी या बीसीसीआयने फक्त 20 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. श्रीलंका मालिका लक्षात ठेवून बहुधा हा निर्णय घेण्यात आला आहे जिथे इतर खेळाडूंना पाठवले जाऊ शकते. श्रीलंका दौर्‍यासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंमध्ये शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव इत्यादींची नावे समोर आली आहेत. मात्र बीसीसीआय अद्याप या दौऱ्याचा तपशील निश्चित करून संघ निवडण्याच्या प्रक्रियेत आहे. श्रीलंकेला चांगले आव्हान ठेवण्यास भारतीय संघात व्हाईट बॉलचे बरेच विशेषज्ञ आहेत हे नाकारता येत नसले तरी व्यवस्थापन या अनोख्या सेटअपला कसे तयार करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासारखे प्रमुख खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर जाणार नसल्याने आता कर्णधारपदासाठी अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवनच्या नावाची चर्चा रंगली आहे. धवनने यापूर्वी आयपीएल व घरगुती क्रिकेटमध्ये कर्णधारपद सांभाळले आहे. मात्र, अद्याप भारतीय संघाच्या कर्णधारपदाची संधी त्याला मिळाली नाही. श्रीलंका दौऱ्यावर तो भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif