R Ashwin (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची उत्तम सुरुवात केली आणि नागपूर कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने शानदार गोलंदाजी केली. अश्विनने (R Ashwin) या सामन्यात एकूण 8 विकेट घेतल्या. त्याचबरोबर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळींचा आकडाही पार केला. आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही अश्विन काही नवीन विक्रम आपल्या नावावर करू शकतो. आर अश्विनची उत्कृष्ट गोलंदाजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे या कसोटी मालिकेत खेळण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघही त्यांच्याविरुद्ध जोरदार तयारी करत होता, मात्र नागपूर कसोटी सामन्यात अश्विनने कांगारूंच्या फलंदाजांवर स्पष्टपणे मात केली. आता दिल्ली कसोटी सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची सर्वांना अपेक्षा असेल.

आर अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्यात 2 मोठे विक्रम आपल्या नावावर नोंदवू शकतो. यामध्ये जर त्याने या कसोटी सामन्यात आणखी 3 विकेट्स मिळवल्या तर तो टीम इंडियाचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल. (हे देखील वाचा: IND vs AUS 2nd Test 2023: टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू आपली 100 वी कसोटी खेळणार, प्रशिक्षक द्रविड केले कौतुक)

याशिवाय आर अश्विनने आतापर्यंत भारतात 25 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे आणि या बाबतीत तो संयुक्तपणे अनिल कुंबळेच्या बरोबरीचा आहे. जर अश्विनने दिल्ली कसोटी सामन्यात एका डावात 5 विकेट्स घेतल्यास तो अनिल कुंबळेला मागे टाकून या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचेल.

जर अश्विनने दुस-या कसोटीत 8 विकेट्स मिळविल्‍यास, माजी भारतीय कर्णधार कपिल देवच्‍या 687 आंतरराष्‍ट्रीय विकेटला मागे टाकून टीम इंडियासाठी सर्व फॉरमॅटमध्‍ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज बनेल. याशिवाय दिल्ली कसोटी सामन्यात अश्विनने आणखी 6 विकेट्स घेतल्यास कपिल देवला मागे टाकून दिल्लीत सर्वाधिक कसोटी बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरेल.

चेतेश्वर पुजाराचा 100 वा कसोटी सामना

टीम इंडियाचा मुख्य फलंदाज चेतेश्वर पुजाराही या कसोटी सामन्यात मैदानात उतरल्याने रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवले जाईल. चेतेश्वर पुजाराच्या कसोटी कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना असेल आणि टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा तो 13वा खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे, जर त्याने या कसोटी सामन्यात 100 धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो चौथा भारतीय खेळाडूही ठरेल.