PBKS vs KKR, TATA IPL 2025 31st Match Live Score Update: कोलकाताच्या गोलंदांजीसमोर पंजाबचा संघ ढेपाळला, केकेआरला विजयासाठी मिळाले 112 धावांचे लक्ष्य
या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाबने नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करत कोलकाता समोर 112 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Punjab Kings vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 31 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (PBKS vs KKR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळवला जात आहे. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अंजिक्य राहणेच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाबने नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करत कोलकातासमोर 112 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
कोलकाताच्या गोलंदांजीसमोर पंजाबचा संघ ढेपाळला
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 15.3 षटकांत दहा गडी गमावून 111 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कर्णधार प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान, त्याने 15 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, प्रियांश आर्यने 22 धावांचे योगदान दिले.
हर्षित राणाची शानदार गोलंदाजी
दुसरीकडे, हर्षित राणाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर वरुन चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला 20 षटकांत 112 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून त्यांच्या खात्यात दोन गुण मिळवायचे आहेत