Cricketer Punam Raut Birthday Special: भारतीय महिला क्रिकेट संघात दमदार कामगिरी करणार्‍या मुंबईकर पूनम राऊत बद्दल खास गोष्टी!

मुंबईत लहानपणी समर कॅम्प मधून तिने खेळायला सुरूवात केली. पुढे अंडर 19 आणि आता इंटनॅशनल क्रिकेटमध्ये पूनम दमदार कामगिरी करत आहे.

Punam Raut| Photo credits: Instagram

भारताच्या महिला क्रिकेट संघामधील मराठमोळी मुलगी पूनम राऊत (Punam Raut) आज (14 ऑक्टोबर) 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. 14 ऑक्टोबर 1989 साली जन्म झालेली पूनम गणेश राऊत ही मुंबईकर मुलगी आहे. मुंबईच्या गल्लीतून सुरू झालेलं क्रिकेटचं वेड तिला क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर घेऊन गेले. मुंबईत लहानपणी समर कॅम्प मधून तिने खेळायला सुरूवात केली. पुढे अंडर 19 आणि आता इंटनॅशनल क्रिकेटमध्ये पूनम दमदार कामगिरी करत आहे. पुनम ने भारतीय महिला क्रिकेटच्या संघाचा भाग म्हणून 2 टेस्ट मॅच, 59 महिला वनडे, आंतरराष्ट्रीय आणि 35 टी-20 इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या आहे. आज तिच्या बर्थडेच्या निमिताने जाणून घ्या पूनम राऊत या मराठमोळ्या मुंबईकर महिला खेळाडूंच्या क्रिकेट विश्वातील काही रेकॉर्डब्रेक कामगिरी बद्दल!

पूनम राऊतची क्रिकेट विश्वातील कामगिरी

  • 15 मे 2017 साली आयर्लंड विरूद्ध मॅच मध्ये पूनम राऊत ने दीप्ती शर्मा सोबत पहिल्या विकेटसाठी 320 धावांची विश्व रेकॉर्ड पार्टनरशीप केली. त्यामध्ये तिचं योगदान 109 धावांचं होतं.
  • पूनमच्या या रेकॉर्ड महिला क्रिकेट विश्वातील सारा टेलर व कॅरेलीन एटकिंस क्जी 229 धावांची तर पुरूष वनडे मधील श्रीलंकेच्या उपुल थरंगा आणि सनथ जयसूर्या यांच्या 286 धावांच्या सलामी पार्टनरशीपचा देखील रेकॉर्ड मोडला होता.
  • भारताकडून पूनम 59 सामने खेळली आहे तर एकूण 1697 धावा केल्या आहेत.
  • पूनम आतापर्यंत केवळ 2 टेस्ट मॅच खेळली आहे त्यामध्ये सर्वाधिक 130 धावा केल्या आहेत.
  • पूनम टी-20 मधे 35 मॅच खेळली आहे. 27.66 च्या रन रेटने तिने 719 रन केले आहेत.
  • टी-20 मध्ये 4 अर्धशतकं ठोकली आहेत.
  • पुनम राऊत 2017 साली झाली झालेल्या भारतीय महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खेळली आहे. यावेळेस महिला टीम फायनल पर्यंत पोहचली होती मात्र 9 धावांनी इंग्लंडने भारतावर विजय मिळवला होता.

 

View this post on Instagram

 

Get ready for the FastandUp mornings #Activate#Reload# recover#fuel your sport

A post shared by Punam Raut (@punamraut_14) on

भारतामध्ये क्रिकेट हा खेळ नसून धर्माप्रमाणे मानला जातो. या एका खेळासाठी सारेजण एकत्र येतात. पण अजूनही पुरूष क्रिकेट इतकं वलय महिला क्रिकेटला प्राप्त झालेलं नही. पुरूषांचं वर्चस्व असलेल्या या खेळात आता महिला देखील उतरल्या आहेत. पुनम राऊत सारख्या अनेक मुली देशाची मान उंचवण्यासाठी काम करत आहेत. मग आज पूनमच्या बर्थ डे निमित्त तिला शुभेच्छा देत महिला क्रिकेट विश्वातील तिच्या पुढिल वाटचालीसाठीदेखील शुभेच्छा!

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now