PSL 2020: विचित्र हेल्मेट घालून शाहिद आफ्रिदी मैदानावर उतरला, 'धोकादायक' म्हणत यूजर्सने केला 'हा' सवाल (See Pics)
हेलमेट्स हे क्रिकेटमधील सुरक्षा गीअर्सपैकी एक मानले जाते. पाकिस्तानचे सदाबहार अष्टपैलू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीग 2020 क्वालिफायर सामन्यादरम्यान एक विचित्र हेल्मेट घालून मैदानावर फलंदाजीला आला. आफ्रिदीने घातलेले हेल्मेट लोखंडी जाळीच्या वरच्या पट्टीशिवाय होते ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आणि ते खूप धोकादायक असल्याचेबर्याच जणांना वाटले.
हेलमेट्स हे क्रिकेटमधील सुरक्षा गीअर्सपैकी एक मानले जाते. क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या दुःखद घटनांना कमी करण्यासाठी हेल्मेटमध्ये बर्याच बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे सदाबहार अष्टपैलू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) 2020 क्वालिफायर सामन्यादरम्यान मुल्तान सुल्तान (Multan Sultans) आणि कराची किंग्ज (Karachi Kings) यांच्यात सामन्या दरम्यान एक विचित्र हेल्मेट घालून मैदानावर फलंदाजीला आला. आफ्रिदीने घातलेले हेल्मेट लोखंडी जाळीच्या वरच्या पट्टीशिवाय होते ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आणि ते खूप धोकादायक असल्याचेबर्याच जणांना वाटले. तथापि, आफ्रिदीने कोणत्याही भीतीशिवाय फलंदाजी केली परंतु फलंदाजीवर प्रभाव पाडण्यात तो अपयशी ठरला. त्याने अर्शद इक्बालच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी 12 चेंडूंत 12 धावा केल्या. मुल्तान सुल्तान संघात असलेला आफ्रिदी आपल्या संघासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. (PSL 2020 Qualifier मॅचमध्ये इमरान ताहीरने घेतला अप्रतिम कॅच, विकेट घेतल्यावर ‘नवीन सेलिब्रेशन’ने नेटकरी चकित Watch Video)
तथापि, आफ्रिदीला त्याच्या घातक हेल्मेटबद्दल ट्विटरवर जोरदार ट्रोल करण्यात आले. एका यूजरने लिहिले की, “मी आफ्रिदीच्या हेल्मेटाप्रमाणे माझ्या घरात निरुपयोगी आहे.” पाहा आफ्रिदीचा विचित्र पण घातक हेल्मेट:
पाहा काही प्रतिक्रिया...
हेल्मेट पाहिल्यानंतर
धोकादायक
नाविन्यपूर्ण पण!
निरुपयोगी
दुसरीकडे, मुल्तान सुल्तान आणि कराची किंग्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. कराची किंग्सने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि मुल्तान संघाला 141 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात किंग्स देखील 20 ओव्हरमध्ये 141 धावाच करू शकले आणि सामना अनिर्णित राहिला. ज्यानंतर अखेर सुपर ओव्हरमध्ये कराची किंग्सने विजय मिळवला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. कराची किंग्जने पीएसएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)