IPL Auction 2025 Live

PRS W vs MLR W 17th Match WBBL 2024 Toss Update: मेलबर्न रेनेगेड्सने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI

ज्यामध्ये पर्थ स्कॉचर्सचा वरचष्मा दिसत आहे. पर्थ स्कॉचर्स महिला संघाने 13 सामने जिंकले आहेत. तर मेलबर्न रेनेगेड्स महिला संघाने 6 सामने जिंकले आहेत.

Perth Scorchers Women vs Melbourne Renegades Women, 17th Match Womens Big Bash 2024 Live Streaming:   महिला बिग बॅश लीग 2024 चा 17 वा सामना आज पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स महिला यांच्यात होत आहे. उभय संघांमधील हा सामना पर्थच्या W.A.C.A येथे खेळला जात आहे.पर्थ स्कॉचर्स महिला संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 जिंकले आहेत तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय पर्थ स्कॉचर्स संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, मेलबर्न रेनेगेड्स महिला संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोन जिंकले आहेत तर दोनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात आहे.  (हेही वाचा  -  SYS W Beat HBH W WBBL 2024 Scorecard: सिडनी सिक्सर्सचा होबार्ट हरिकेन्सवर 6 धावांनी विजय, कर्णधार एलिस पेरीची 86 धावांची शानदार खेळी )

दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड

पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स महिला संघात आतापर्यंत एकूण 19 वेळा सामना झाला आहे. ज्यामध्ये पर्थ स्कॉचर्सचा वरचष्मा दिसत आहे. पर्थ स्कॉचर्स महिला संघाने 13 सामने जिंकले आहेत. तर मेलबर्न रेनेगेड्स महिला संघाने 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे पर्थ स्कॉचर्स महिला संघ अधिक मजबूत दिसत आहे, हे स्पष्ट झाले आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग XI

मेलबर्न रेनेगेड्स महिला संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), कोर्टनी वेब, ॲलिस कॅप्सी, एम्मा डी ब्रुग्स, जॉर्जिया वेरेहॅम, डिआंड्रा डॉटिन, नाओमी स्टॅलेनबर्ग, निकोल फाल्टम (विकेटकीपर), सारा कोयटे, तारा नॉरिस, मिली इलिंगवर्थ, जॉर्जिया चॅकेरिस, जॉर्जिया बॅकेरिस

पर्थ स्कॉचर्स महिला संघ: सोफी डेव्हाईन (कर्णधार), बेथ मूनी, डेलन हेमलता, एमी जोन्स (विकेटकीपर), मिकायला हिंकले, क्लो पिपारो, ॲलाना किंग, क्लो एन्सवर्थ, एमी लुईस एडगर, लिली मिल्स, एबोनी हॉस्किन, मॅडी डार्क, कार्ली लीसॉन , नी मेड पुत्री सुवांडेवी, स्टेला कॅम्पबेल