SYS W Beat HBH W WBBL 2024 Scorecard: सिडनी सिक्सर्सचा होबार्ट हरिकेन्सवर 6 धावांनी विजय, कर्णधार एलिस पेरीची 86 धावांची शानदार खेळी

या सामन्यात सिडनी सिक्सर्सने दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करताना होबार्ट हरिकेन्सला 20 षटकांत 9 बाद 149 धावांच करता आल्या. डॅनियल व्याट-हॉजने होबार्ट हरिकेन्सकडून सर्वाधिक 30 धावा केल्या.

SYS W Beat HBH W WBBL 2024 Scorecard: सिडनी सिक्सर्सचा होबार्ट हरिकेन्सवर 6 धावांनी विजय, कर्णधार एलिस पेरीची 86 धावांची शानदार खेळी
Ellyse Perry (Photo: X)

Hobart Hurricanes Women vs Sydney Sixers Women, 15th Match Womens Big Bash 2024 Scorecard:  महिला बिग बॅश लीग 2024 चा 15 वा सामना आज होबार्ट हरिकेन्स महिला विरुद्ध सिडनी सिक्सर्स महिला यांच्यात बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे खेळला जात आहे. या सामन्यात होबार्ट हरिकेन्स महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सिडनी सिक्सर्स महिला संघाने 7 गडी गमावून 155 धावा केल्या. सिडनी सिक्सर्सकडून कर्णधार एलिस पेरीने शानदार खेळी केली. एलिस पेरीने 62 चेंडूत 86 धावांची खेळी केली. ज्यात त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. या सामन्यात सिडनी सिक्सर्सने  होबार्ट हरिकेन्सवर 6 धावांनी विजय मिळवला.  (हेही वाचा  -  AFG vs BAN 1st ODI 2024 Toss Update: अफगाणिस्तानाने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग XI )

पाहा पोस्ट -

या सामन्यात सिडनी सिक्सर्सने दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करताना होबार्ट हरिकेन्सला 20 षटकांत 9 बाद 149 धावांच करता आल्या. डॅनियल व्याट-हॉजने होबार्ट हरिकेन्सकडून सर्वाधिक 30 धावा केल्या. तर काओमहे ब्रे, लॉरेन चीटल, सोफी एक्लेस्टोन यांनी सिडनी सिक्सर्ससाठी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.  सिडनी सिक्सर्सकडून कर्णधार एलिस पेरीने शानदार खेळी केली. एलिस पेरीने 62 चेंडूत 86 धावांची खेळी केली. तिला या सामन्याची प्लेअर्स ऑफ द मॅच हा खिताब देण्यात आला.

 

(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2024 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).