Doping संदर्भात बंदीनंतर पृथ्वी शॉ याने दिले स्पष्टीकरण, सांगितली चूक कुठे झाली

याबाबत पृथ्वीने ट्विटरवर आपली चूक मान्य करत एक पोस्ट शेअर केली आहे.

पृथ्वी शॉ (Photo: Getty)

भारतीय क्रिकेटचा उगवता तारा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) डोप टेस्टमध्ये दोषी आढळळा असून त्याच्यावर 15 नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Sayyed Mushtaq Ali Trophy) वेळी पृथ्वीच्या यूरीनचे सॅम्पल घेण्यात आले होते. आणि त्यात बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याचं आढळलं. टर्ब्यूटलाइन नावाचा हा पदार्थ कफ सिरपमध्ये वापरला जातो. या पदार्थाच्या सेवनावर वाडाने बंदी घातली आहे. शॉवर 16 मार्च ते 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. याबाबत पृथ्वीने आपले मौन सोडले आहे आणि ट्विटरवर आपली चूक मान्य करत एक पोस्ट शेअर केली आहे. डोपिंग बंदीसंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त पृथ्वी म्हणाला की,"क्रिकेट हे माझे जीवन आहे आणि या बातमीने मला खरोखरच हलवून टाकले आहे." (क्रिकेटर पृथ्वी शॉ याचे आठ महिन्यांसाठी निलंबन, कफ सिरप मधून डोपिंग केल्याप्रकरणी BCCI ची कठोर कारवाई)

शॉने लिहिले की तो त्याचे नशिब स्वीकारतो आणि बंदीमधून आणखी मजबूत परतण्याची आशा करतो. "भारताच्या ऑस्ट्रेलिया (Australia) दौर्‍याच्या वेळी मला दुखापत झाली होती आणि त्यानंतर मी क्रिकेटमध्ये सक्रिय होत होतो. पण खेळण्याच्या उत्सुकतेमुळे मी सावधगिरी बाळगण्यासाठी प्रोटोकॉलचे अनुसरण केले नाही. मी माझे नशीब स्वीकारतो. मी अजूनही माझ्या दुखापतीशी झगडत आहे जी मला मागील स्पर्धेत झाली होती. पण या बातमीने मला धक्का बसला आहे."

शॉने पुढे लिहिले की, 'मी माझी चूक मान्य करतो आणि मला आशा आहे की भारतातील इतर खेळाडू अशा गोष्टींबाबतीत सतर्क राहतील. अ‍ॅथलीट्सना लहान आजारांसाठी औषधे घेताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. औषध काउंटरवर उपलब्ध का असो, पण तुम्हाला प्रोटोकॉलचे अनुसरण करणे आवश्यक आहे."

दरम्यान, शॉसह अक्षय दुल्लारवार (विदर्भ) आणि दिव्या गजराज (राजस्थान) यांच्यावर देखील उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी वाढल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अक्षयवर 9 नोव्हेंबरपर्यंत तर गजराजवर 25 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.