Prithvi Shaw Dating TV Actress: पृथ्वी शॉ करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट? भारताचा युवा सलामी फलंदाजाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून चर्चांना उधाण
पृथ्वीच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्राचीने पोस्ट केलेल्या कमेंटमुळे डेटिंगबद्दलच्या चर्चा रंगल्याच दिसत आहे. दोघांकडून अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी केली नसल्याने ते एकमेकांना डेट करत आहेत की नाही.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये यंदा (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) एक महत्त्वाचा खेळाडू असेल. 19 सप्टेंबरपासून अबु धाबी येथे मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी तो अव्वल फॉर्ममध्ये असल्याची खात्री करण्यासाठी टीम इंडियाचा हा युवा सलामी फलंदाज प्रयत्नशील आहे. युएई येथे असलेला पृथ्वी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर आपल्या प्रशिक्षणाविषयी व्हिडिओ पोस्ट करत आहे. तथापि, त्याच्या बर्याच पोस्टवर एक टिप्पणी सतत दिसत राहिली आणि ती म्हणजे टीव्ही अभिनेत्री प्राची सिंहची (Prachi Singh) आहे. कलर्स टीव्हीवरील मालिका 'उडान' या टीव्ही शोमध्ये अभिनेत्रीची भूमिका होती. 20 वर्षीय शॉ फलंदाजीत दमदार कामगिरी करताना दिसतो आणि त्याच्या कामगिरीमुळे काही तरूणीही त्याच्या फॅन होतात. नुकतच पृथ्वीच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून तो प्राचीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (IPL 2020 Update: रिषभ पंतने शारजाहमध्ये ठोकलेला षटकार करून देईल सौरव गांगुलीने युएई ग्राउंडवर मारलेल्या सिक्सची आठवण Watch Video)
पृथ्वीच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्राचीने पोस्ट केलेल्या कमेंटमुळे डेटिंगबद्दलच्या चर्चा रंगल्याच दिसत आहे. प्राची सातत्याने पृथ्वीच्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसते आणि युवा फलंदाज देखील तिच्या कमेंट्सना लाईक करतो किंवा रिप्लाय देताना दिसून आले आहे. दोघांकडून अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी केली नसल्याने ते एकमेकांना डेट करत आहेत की नाही.
दरम्यान, अवघ्या काही दिवसांनी सुरु होणाऱ्या आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटलसाठी डावाची सुरुवात करताना पृथ्वी महत्त्वाचा खेळाडू असेल. गेल्या एका वर्षात शॉने एक कठीण काळ सहन करावा केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी येथे सराव सामन्यादरम्यान त्याला घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला दौऱ्याच्या मधून परतावे लागले होते. त्यानंतरच्या काही महिन्यांत, ड्रग्स टेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतर पृथ्वीवर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती. बंदी उठताच त्याने हळू हळू खेळात प्रवेश केला आणि आता दिल्ली कॅपिटल्ससाठी आणखी एक पाऊल पुढे जाऊन त्यांना पहिले विजेतेपद जिंकण्यास मदत करण्यासाठी तो उत्सुक असेल. दिल्ली कॅपिटल्स 20 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएलच्या मोहीमेला सुरुवात करेल.