सचिन तेंडुलकरचे शारजाह (Sharjah) येथील 'डेजर्ट स्टॉर्म' क्रिकेट चाहत्यांच्या आठवणीत अजूनही कायम आहे, माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) देखील युएई क्रिकेट मैदानावरही काही संस्मरणीय क्षणांचा आनंद लुटला आहे. माजी भारतीय कर्णधाराने 1998 मध्ये कोका कोला चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झिम्बाब्वेचा अष्टपैलू ग्रँड फ्लॉच्या चेंडूवर 3 सलग षटकारांचा पाऊस पडला. 22 वर्षानंतर, आणखी एक डावखुऱ्या फलंदाजाने फिरकीपटूविरुद्ध स्टँडमध्ये षटकार ठोकला. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) अगोदर संघाच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा रिषभ पंत शारजाह क्रिकेट स्टेडियममधील नेट सत्रात आपला वेळ एन्जॉय करत होता. पंतने अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राच्या (Amit Mishra) चेंडूवर सलग तीन षटकार ठोकले. पंतने एक षटकार डीप फाइन-लेगवर स्टॅन्डमध्ये षटकार मारला ज्यावर सर्वांनी त्याचे कौतुक केले. (IPL 2020 Update: दिल्ली कॅपिटल्ससाठी फिनिशरच्या भूमिकेसाठी अजिंक्य रहाणे सज्ज, आयपीएल 13 मध्ये मिडल-ऑर्डरमध्ये करू शकतो बॅटिंग)
फ्रँचायझीने सामायिक केलेल्या क्लिपमध्ये पंतने सलग तीन सिक्स मारले, त्यापैकी एक त्याने लॉन्ग-ऑफवर मारला. युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आगामी आयपीएल हंगामात पंत दिल्ली कॅपिटलसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डीसी या मोसमात त्यांचे गुरू सौरव गांगुलीशिवाय असतील परंतु त्यांचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या देखरेखीखाली सध्या सर्व खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. पंतने मारलेल्या सलग तीन षटकाराचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला आणि असेच शॉट कोठे पहिले हे यूजर्सना विचारले. "शारजाह येथे फिरकीपटूच्या चेंडूवर षटकार मारणारा भारतीय डावखुरा फलंदाज. बरं, हे आम्ही यापूर्वी कुठे ऐकलं आहे?" यावर एका यूजरने गांगुलीचा 1998 कोका-कोला कप सामन्यादरम्यान मारलेल्या तीन सलग षटकारांचा व्हिडिओ शेअर केला. पाहा हा व्हिडिओ:
DC admin is great!https://t.co/YCGAFAqAdL
— Wayne Ferreira (@atwayne10) September 8, 2020
अलीकडच्या काळात पंत दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगला फॉर्मात होता. त्याने आयपीएल 2018 मध्ये 684 धावा केल्या आणि फॉर्म कायम ठेवत मागील वर्षी 488 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात मोठी भूमिका निभावली. दिल्ली कॅपिटल्सने संघात अजून ताकद वाढवत अजिंक्य राजेणे, शिमरॉन हेटमीयर, मार्कस स्टोईनिस आणि अॅलेक्स कॅरी यांचा समावेश केला. त्यांच्याकडे आर अश्विन, संदीप लामिचाने, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांच्यासारख्या फिरकी गोलंदाजांचा युनिट आहेत. दिल्ली कॅपिटल्स 20 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएलच्या मोहीमेला सुरुवात करेल.