PBKS vs RR: जयस्वाल-पड्डिकलची अर्धशतकीय खेळी आणि हेटमायरच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर राजस्थानकडून पंजाबचा चार विकेटने पराभव
राहुल चहरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूत 5 धावांची गरज असताना ध्रुव जुरेलने षटकार मारत राजस्थानला हा सामना जिंकवला.
आजच्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. या पराभवाने आयपीएलमधील पंजाब किंग्जचा प्रवास इथेच संपला आहे. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर पंजाब किंग्ज संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 20 षटकात 5 गडी गमावून 187 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद 49 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून नवदीप सैनीने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने 19.4 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. राहुल चहरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूत 5 धावांची गरज असताना ध्रुव जुरेलने षटकार मारत राजस्थानला हा सामना जिंकवला.
पाहा ट्विट -
Match 66. Rajasthan Royals Won by 4 Wicket(s) https://t.co/3cqivbD81R #TATAIPL #PBKSvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 19, 2023 11:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

