Paris Explosion-Like Sound: फायटर जेटच्या स्फोटासारख्या आवाजाने काही काळ थांबली Roland Garros टेनिस स्पर्धा, पाहा व्हिडिओ

मोठा आवाज ऐकून संपूर्ण शहर थक्क झाले. फ्रेंच लढाऊ जेटमुळे झालेल्या ध्वनीने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत खेळत असलेल्या स्टॅन वावरिंका आणि डोमिनिक कोएफर यांनाही धक्का जाणवला. रोलँड गॅरोसच्या आसपास जोरदार आवाज ऐकू येताच वावरिंका आणि कोएफर यांच्यातील सामना थोड्यावेळासाठी थांबवण्यात आला.

स्टॅन वावरिंका आणि डोमिनिक कोएफर (Photo Credit: Twitter)

Paris Explosion-Like Sound: फ्रान्सची (France) राजधानी पॅरिस (Paris) येथे जोरदार स्फोट झाला, ज्याचे वर्णन सोनिक बूम (Sonic Boom) म्हणून केले जात आहे. मोठा आवाज ऐकून संपूर्ण शहर थक्क झाले. पॅरिस आणि जवळपासच्या उपनगरामध्ये मोठ्याने ऐकलेला आवाज हा स्फोटांमुळे नव्हे तर लष्करी जेटच्या (Military Jet) ध्वनिमुद्रकामुळे झाला असल्याची फ्रेंच पोलिसांनी (French Police) याची पुष्टी केली आहे. पॅरिस पोलिसांनी सांगितले की एका फायटर जेटने (Fighter Jet) ध्वनीतीव्रतेची कमाल पातळी ओलांडल्याने हा आवाज ऐकू आला आहे. या प्रचंड आवाजाने पॅरिसमधील रहिवाशांना हादरून सोडले आणि फ्रेंच राजधानीत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपली भीती व्यक्त केली. इतकंच नाही तर पॅरिस येथे सुरु असलेल्या फ्रेंच ओपन (French Open) टेनिस स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान देखील याचा आवाज जाणवला. फ्रेंच लढाऊ जेटमुळे झालेल्या ध्वनीने  फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत खेळत असलेल्या स्टॅन वावरिंका (Stan Wawrinka) आणि डोमिनिक कोएफर (Dominik Koepfer) यांनाही धक्का जाणवला. (Paris Explosion-Like Sound: स्फोटाच्या आवाजाने हादरले पॅरीस; फायटर जेटने ओलांडली ध्वनीतीव्रतेची कमाल पातळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण)

आज सकाळी रोलँड गॅरोसच्या (Roland Garros) आसपास जोरदार आवाज ऐकू येताच वावरिंका आणि कोएफर यांच्यातील सामना थोड्यावेळासाठी थांबवण्यात आला. दरम्यान, जेव्हा फायटर जेट मर्यादित आवाजाच्या वेगापेक्षा अधिकने उड्डाण करते तेव्हा धमाका होतो ज्याला Sonic Boom असे म्हटले जाते. स्फोटाच्या आवाजाने बरेच लोक हादरून गेलेहोते कारण काही दिवसांपूर्वी बॉम्बच्या धमकी देण्यात आली होती त्यानंतर फ्रान्सचे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आयफेल टॉवर (Eiffel Tower) बुधवारी बंद करण्यात आले. तुम्हीही पाहा थक्क करणारा 'तो' आवाज:

दरम्यान, या आवाजाने पॅरिसवारसीयांना हादरून सोडले ज्यांनी पोलीस आपत्कालीन फोन लाईनवर कॉल करण्यास सुरुवात केली. मात्र आता पोलिसांनी लोकांना आपत्कालीन फोन लाइनवर कॉल करु नये असे सांगितले. फ्रेंच सैन्याने सांगितले की ध्वनी अडथळा पार करणार्‍या जेटला रेडिओ संपर्क तुटलेल्या दुसर्‍या विमानाच्या मदतीसाठी पाठवले होते. या जेटला सुपरसोनिक वेगाने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या आवाजामुळे कुठेही धूर किंवा आग लागल्याची घटना घडली नाही, तसेच इतरही काही नुकसान झाले नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif