IPL Auction 2025 Live

Imam ul Haq Online Scandal: पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम उल हक याच्याकडून 'त्या' प्रकरणाचा अप्रत्यक्ष स्वीकार, PCB ने कान उघडणी केल्यावर मागितली माफी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान (Wasim Khan) यांनी सोमवारी सांगितले की, इमामने घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे.

इमाम-उल-हक (Photo by Laurence Griffiths/Getty Images)

विश्वचषकमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे चर्चेत असलेला पाकिस्तान (Pakistan) संघाचा युवा फलंदाज आणि सलामीवीर इमाम उल हक (Imam ul Haq) सध्या नवीन वादात फसला आहे. त्याच्यावर एकाचवेळी अनेक मुलींसोबत अफेअर आणि त्या तरूणींना धोका देण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. एका ट्विटर युजरने चार तरूणींसोबतचे इमामच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करून आरोप लावले आहेत. या नव्या वादानंतर इमाम याने निःसंशयपणे माफी मागितली आहे. पाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला फटकारे लावली आहे. (पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम-उल-हकवर अनेक मुलींशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप, ट्विटरवर WhatsApp चॅट स्क्रीन शॉट वायरल)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) व्यवस्थापकीय संचालक वसीम खान (Wasim Khan) यांनी सोमवारी सांगितले की, इमामने घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे. पण आम्ही त्याला स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जरी ही त्यांची वैयक्तिक आणि खाजगी बाब आहे परंतु आम्ही आमच्या खेळाडूंनी नीतिशास्त्र आणि शिस्त या उच्च गुणवत्तेचे पालन करण्याची अपेक्षा करतो."

एका ट्विटर युजरने इमामवर आरोप लावला की तो एकाच वेळी अनेक तरूणीसोबत अफेअर करत आहे. आणि त्याचे व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट देखील त्याने ट्विटरकार शेअर केले होते. युजरने दावा केला की, हे त्या चार तरूणींच्या व्हॉट्सअॅपचे स्क्रीनशॉट आहेत. दरम्यान, आमही या स्क्रीनशॉट्सच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. इमामच्या व्हॉट्सअॅप चॅटचे शेअर करण्यात आलेल्या सोशल मीडियावर एका नव्या वादाला सुरुवात झाली. शिवाय लोकांनी सोशल मीडियावर याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत टाके केली आहे. इमामने आतापर्यंत पाकिस्तान संघासाठी 10 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान, इमामने 19 डावांत 47.5 च्या स्ट्राइक रेटने 483 धावा केल्या आहेत. इमामने टेस्ट क्रिकेटमध्ये ३ अर्धशतक ठोकली आहे.