Shahid Afridi On Surya Kumar Yadav: पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याच्याकडून सूर्यकुमार यादव याच्यावर स्तुतीसुमने, घ्या जाणून
आफ्रिदीने सांगितले की विराट कोहलीला पाहण्यासाठी त्याने टीव्ही चालू केला होता, पण सूर्यकुमारचा झटका पाहून तो आश्चर्यचकित झाला.
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल (KL Rahul) बाद झाल्यानंतर मैदानावर खेळण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) 14व्या षटकात धमाकेदार एंट्री केली. क्रीजवर येताच त्याने त्याचे आवडते शॉट्स खेळायला सुरुवात केली. 14व्या षटकात त्याने फिरकीपटू यासीम मोर्तझाच्या चेंडूवर लागोपाठ दोन चौकार मारले आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. सूर्यकुमारच्या खेळीने हाँगकाँगला बॅकफूटवर ढकलले. मात्र, त्याआधीच्या षटकांमध्ये हाँगकाँगच्या गोलंदाजांनी विराट कोहली आणि केएल राहुलला वेगवान धावा करण्याची संधी दिली नाही. सूर्यकुमारच्या धमाकेदार खेळीमुळे भारताने शेवटच्या तीन षटकांत 50 धावा केल्या आणि त्यामुळं संघाने 192 धावांची मजल मारली. सूर्यकुमार यादव 26 चेंडूत 68 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 6 षटकार आणि 6 चौकार मारले.
कोहलीला 'देव' म्हणणाऱ्या सूर्यकुमारने आपल्या खेळीने विराट कोहलीसह अनेक दिग्गजांची मने जिंकली. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे नावही जोडले गेले आहे. आफ्रिदीने सांगितले की विराट कोहलीला पाहण्यासाठी त्याने टीव्ही चालू केला होता, पण सूर्यकुमारचा झटका पाहून तो आश्चर्यचकित झाला. (हे देखील वाचा: Asia Cup: एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय ठरला सूर्यकुमार, विराट कोहलीचाही विक्रम मोडला)
शाहिद आफ्रिदीने शमा टीव्हीला सांगितले की, "हो, मला थोडा वेळ मिळाला म्हणून मी विराटची फलंदाजी पाहत बसलो होतो. कारण त्याला या सामन्यात चांगली कामगिरी करण्याची संधी होती. ही कामगिरी करणे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि ते कोणत्याही संघाविरुद्ध असले तरी पुढे जाण्याचा आत्मविश्वास त्याला मिळतो. विराट तसा खेळला, पण हा कुमार ज्या प्रकारे आला, त्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, फक्त सकारात्मक विचाराने आला. तो परवाना घेऊन आला होता की मला कोणताही चेंडू थांबवायचा नाही.