Pakistan Women vs Sri Lanka Women, 2nd Match Scorecard: पाकिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी 116 धावांचे लक्ष्य ठेवले; चमारी अथापथू आणि सुगंधिका कुमारी यांची धडाकेबाज गोलंदाजी पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड पहा

आयसीसी महिला टी 20 विश्वचषक आजपासून सुरू झाला आहे. टी 20 विश्वचषकाचा दुसरा सामना पाकिस्तान महिला संघ विरुद्ध श्रीलंका महिला संघात खेळला जात आहे. पाकिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी 116 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चमारी अथापथू आणि सुगंधिका कुमारी यांनी धडाकेबाज गोलंदाजी केली.

Pakistan Women National Cricket Team vs Sri Lanka Women National Cricket Team, ICC Women's T20 World Cup 2024 2nd Match Scorecard: आयसीसी महिला टी 20 विश्वचषक आजपासून सुरू झाला आहे. टी 20 विश्वचषकाचा दुसरा सामना पाकिस्तान महिला संघ विरुद्ध श्रीलंका महिला संघात होत आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पाकिस्तानची कमान फातिमा सनाच्या खांद्यावर आहे. तर श्रीलंकेचे नेतृत्व चमारी अथापथु करत आहे. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार सना फातिमा हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाचे दोन फलंदाज अवघ्या 17 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. पाकिस्तानचा संपूर्ण संघ निर्धारित 20 षटकात केवळ 116 धावांवरच मर्यादित राहिला. पाकिस्तानसाठी कर्णधार फातिमा सनाने 30 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 20 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. फातिमा सना व्यतिरिक्त निदा दारने 23 धावा केल्या.

सुगंधिका कुमारीने श्रीलंकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. श्रीलंकेसाठी उदेशिका प्रबोधिनी, चामारी अथापथु आणि सुगंधिका कुमारी यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. उदेशिका प्रबोधनी, चमारी अथापथु आणि सुगंधिका कुमारी यांच्याशिवाय कविशा दिलहरीने एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 20 षटकात 117 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकून दोन्ही संघांना या स्पर्धेची विजयाने सुरुवात करायची आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement