Pakistan Women vs New Zealand Women T20 Head To Head: पाकिस्तान-न्यूझीलंड संघात होणार चुरशाची सामना, येथे हेड टू हेड आकडेवारी पहा

उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टी-20 विश्वचषकात पाकिस्तान संघ आतापर्यंत तीन सामने खेळला आहे.

PAK vs NZ (Photo Credit: @ICC)

Pakistan Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team T20 Head To Head: 2024 च्या आयसीसी (ICC)महिला टी 20 विश्वचषकाचा 19 वा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAK vs NZ)महिला संघात आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टी-20 विश्वचषकात पाकिस्तान संघ आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. ज्यामध्ये एकात विजयी झाला असून इतर 2 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत, उपांत्य फेरी गाठण्यासाठी, पाकिस्तान संघाला न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 मध्ये विजयाची नोंद झाली आहे. तर एकात पराभवाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी न्यूझीलंड संघाला पाकिस्तानविरुद्ध तिसरा विजय नोंदवायचा आहे. (हेही वाचा:Pakistan Women vs New Zealand Women, 19th Match Pitch Report: दुबई स्टेडीयमवर कोणाचे असणार वर्चस्व; फलंदाज की गोलंदाज करणार वरचढ? खेळपट्टीचा अहवाल घ्या जाणून )

दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी

पाकिस्तान महिला आणि न्यूझीलंड महिला संघ 11 वेळा टी 20 मध्ये खेळले आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे. न्यूझीलंडने 9 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला केवळ 2 मध्ये विजय मिळाला नाही.

दोन्ही संघांचे खेळाडू

पाकिस्तान महिला संघ: मुनिबा अली (विकेटकीपर/कर्णधार), सिद्रा अमीन, सदाफ शमास, निदा दार, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, इरम जावेद, तुबा हसन, सय्यदा अरुब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल, डायना बेग, गुल फिरोझा, फातिमा प्रिय, तस्मिया वायफळ बडबड

न्यूझीलंडचा महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गॅझे (विकेटकीपर), लेह कॅस्परेक, ली ताहुहू, रोझमेरी मायर, ईडन कार्सन, हन्ना रो, जेस केर, फ्रॅन जोनास, मॉली पेनफोल्ड