T20 World Cup Final: आज बटलर विरुध्द बाबर, टी २० विश्वचषकाचा मानकरी कोण?
टीम इंडिया फायनल्स मध्ये नसला तरी भारतीयांची उत्सुकता शिगेला पेटली आहे.
आज पाकिस्तान (Pakistan) किंवा इंग्लंड (England) कुणीही टी २० विश्वकप (T20 World Cup) मालिकेचा मानकरी ठरला तरी तो संघ दुसऱ्यांदा या विश्वकपाचा मानकरी ठरणार आहे. कारण यापूर्वी पाकिस्तानने (Pakistan) 2009 मध्ये टी२० विश्वचषक (T20 World Cup) पटकावला आहे तर 2010 मध्ये इंग्लंड संघाने टी२० विश्व कपावर आपलं नाव नोंदवलं आहे. यापूर्वी वेस्ट इंडीज (West Indies) फक्त एकमेव असा संघ होता जो टी२० विश्वकपाचा (T20 World Cup) मानकरी ठरला होता पण आज इंग्लंड (England) किंवा पाकिस्तान (Pakistan) देखील दोन कपाचा मानकरी ठरणार आहे. बटलर (Buttler) विरुध्द बाबर (Babar) या हाय व्होल्टेज क्रिकेट मॅचची (High Voltage Cricket Match) प्रतिक्षा संपूर्ण जगाला लागली आहे. टीम इंडिया फायनल्स मध्ये नसला तरी भारतीयांची उत्सुकता शिगेला पेटली आहे. 2007 मध्ये टी२० विश्वचषक (T20 World Cup) पटकावणारा भारतीय संघ 15 वर्षांपासून विश्वकपाच्या प्रतिक्षेत असला तरी आज भारतीय क्रिकेट फॅन्सच्या मनात कौल कुणाल अशा आशयाच्या पोस्ट (Post) सोशल मिडीयावर व्हायरल (Social Media Viral) होताना दिसत आहे.
पाकिस्तानने (Pakistan Cricket Team) क्रिकेट टीमचं पहिल्या काही सामन्यांमधील प्रदर्शन अत्यंत खराब ठरलं असलं तरी आज पाकिस्ताननं (Pakistan) थेट फायन गाठलं आहे. पाकिस्तानने पहिले दोन सुपर 12 सामने गमावले पण पुढील सलग तीन जिंकत सेमी फायन्सल्समध्ये (Semi Finale) न्यूझीलंडवर (New Zealand) सात विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. दुसरीकडे, इंग्लंडने सुपर 12 टप्प्यातील गट 1 मध्ये सात गुणांसह दुसरे स्थान पटकावले आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा 10 गडी राखून पराभव करून फायनल गाठलं. (हे ही वाचा:- Virat Kohli Video: ऑस्ट्रेलियाहून मुंबईत पोहोचताच विराट कोहलीने चाहत्यांचा केला सामना, मानले आभार (Watch Video))
1992 च्या त्याच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) 1992 च्या विश्वचषक फायनलमध्ये आजचा सामना हा थ्रोबॅक (Throwback) सामना आहे. 1992 मध्ये माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खानच्या (Emraan Hashmi) नेतृत्वाखालील पाकिस्तानने (Pakistan) इंग्लंडला (England) पराभूत करून पहिला वर्ल्ड ट्रॉफी (World Trophy) जिंकली होती. तर आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार का अशी उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागली आहे. यावेळी टी २० विश्वचषकात (T20 World Cup) भारताकडून (India) आणि झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान विश्वकप अंतीम फेरीत पोहचेल हे कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण खेळात कधीही काहीही होवू शकतं. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार ह्याची उत्सुकता शिगेला पेटली आहे.