Pakistan vs Bangladesh 2nd Test Match: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेशमधल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाचा खेळ; पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

या मालिकेत बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरु आहे.

PAK vs BAN (Photo Credit - X)

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात आजपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सामना खेळवला जाणार होता पंरतू पहिल्या दिवशी पावसाने खेळ केला आहे. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळवला जाणार होता पण आजचा दिवस पावसाने वाया गेल्याने उद्या  सकाळी हा सामना सुरु होण्याची अपेक्षा आहे.

पहिल्या कसोटीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.  या मालिकेत बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरु आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने मोठी मेहनत घेतली असून हा सामना हरल्यास किंवा अनिर्णीत राहिल्यास बांगलादेश मालिका विजय प्राप्त करेल.  बांगलादेशचा हा पहिला पाकिस्तानविरुद्धचा मालिका विजय असणार आहे.  (हेही वाचा -  Pakistan vs Bangladesh Head To Head Record: आजपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार दुसरा कसोटी सामना, जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रिकॉर्ड)

पाहा पोस्ट -

 

आजच्या सामन्यात पावसाचा खेळ पहायला मिळाला आहे.  पावसामुळे नाणेफेक देखील आज झाली नसून आजचा दिवस देखील पावसामुळे वाया गेला आहे. पाऊस जाईल या आशेने सामनाधिकारी वाट पाहात होते. पण तसं काही झालं नाही. अखेर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.  पहिला कसोटी सामना विजयामुळे बांगलादेशचा संघ निश्चिंत आहे. उद्याही पावसाने हजेरी लावली तर खेळ होणं कठीण होईल. जर असं झालं तर बांगलादेश पाकिस्तानमध्ये इतिहास रचू शकतो.