India Women vs Pakistan Women, 7th Match Live Score Update: पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी ठेवले 106 धावांचे लक्ष्य, भारतीय गोलंदाजांची घातक कामगिरी

भारताला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे तर पाकिस्तानने आपल्या मोहिमेची सुरवात विजयाने केली आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला आजचा सामना 'करो या मरो'चा आहे. दरम्यान, पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी -- धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

India Women vs Pakistan Women, 7th Match Live Score Update: पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी ठेवले 106 धावांचे लक्ष्य, भारतीय गोलंदाजांची घातक कामगिरी
IND W (Photo Credit - X)

India Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 7th Match: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आज भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) महिला संघ आमनेसामने आले आहेत. या दोघांमधील सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व फातिमा सना करत आहे. भारताला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे तर पाकिस्तानने आपल्या मोहिमेची सुरवात विजयाने केली आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला आजचा सामना 'करो या मरो'चा आहे. दरम्यान, पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 106 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

हे देखील वाचा: Yuvraj Singh: युवराज सिंग बनला विराट कोहलीचा शेजारी, अलिशान घराची किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क!

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताचा संघ 20 षटकात आठ विकेट गमावून 105 धावा करु शकला. पाकिस्तानचा संघ पहिल्याच षटकापासून डगडगला. भारतीय स्टार गोलंदाज रेणूका सिंगने पाहिल्याच षटकात विकेट घेत पाकिस्ताला धक्का दिला. त्यानंतर लागोपाठ पाकिस्तानने विकेट गमावल्या.

भारतीय गोलंदाजानी शानदार कामगिरी करत पाकिस्तानच्या फलंदाजाना जास्ट वेळ टीकू नाही दिले. भारताकडून अरुंधती रेड्डी 3 आणि श्रेंयका पाटीलने दोन विकेट घेतल्या. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 106 धावा करायच्या आहेत

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2024 05:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).