पाकिस्तान फलंदाज आसिफ अली याच्या दोन वर्षाच्या मुलीचे कॅन्सरमुळे निधन

पाकिस्तान (Pakistan) फलंदाज आसिफ अली (Asif Ali) याच्या दोन वर्षाच्या मुलीचे कॅन्सरमुळे (Cancer) निधन झाल्याची घटना घडली आहे.

Asif Ali (Photo Credits-Twitter)

पाकिस्तान (Pakistan) फलंदाज आसिफ अली (Asif Ali) याच्या दोन वर्षाच्या मुलीचे कॅन्सरमुळे (Cancer) निधन झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आसीफ ह्याला इंग्लंड (England) दौऱ्यातून मायदेशी परतावे लागले आहे. लंडन येथील एका हॉस्पिटलमध्ये त्याच्या मुलीवर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याच्या मुलीने अखेरचा श्वास घेतला.

आसिफ अली याच्या मुलीला चौथ्या स्टेजमधील कॅन्सरने ग्रासले होते. जेव्हा आसीफ याला मुलीच्या निधनाची बातमी कळली असता तो इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या वन डे सामन्यावेळी क्रिकेटच्या मैदानावर खेळत होता.

याबद्दल पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक यांनी दुजोरा दिला आहे. तसेच या दु:खद घटनेमुळे अनेक क्रिकेटपटू त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत.