पाकिस्तान कर्णधार बाबर आझम आणि वरिष्ठ खेळाडूंची PCB कडे पगार वाढवण्याची मागणी, क्रिकेटपटूंचे वेतन जाणून बसेल आश्चर्याचा धक्का
एकीकडे, बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बनला आहे आणि भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू त्यांच्या कमी पगारावर रडत आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पीसीबीला पगार वाढवण्याची विनंती केली आहे. खेळाडूंनी निराश होणे अपरिहार्य आहे कारण पाकिस्तानच्या खेळाडूंना इतका कमी पगार मिळतो की आपण हे जाणून चकित व्हाल.
एकीकडे, बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बनला आहे आणि भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू (Pakistan Cricketers) त्यांच्या कमी पगारावर रडत आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) पीसीबीला (PCB) पगार वाढवण्याची विनंती केली आहे. जगातील नंबर वनडे फलंदाज आणि पाकिस्तानी कर्णधार बाबर आपल्या पगारावर नाराज असल्याचा दावा cricketpakistan.com.pk ने आपल्या अहवालात केला आहे. त्यांच्याशिवाय मोहम्मद रिझवान, हसन अली (Hasan Ali) आणि शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) असे वरिष्ठ खेळाडू देखील त्यांच्या पगारावर नाखूश आहेत. तसे, खेळाडूंनी निराश होणे अपरिहार्य आहे कारण पाकिस्तानच्या खेळाडूंना इतका कमी पगार मिळतो की आपण हे जाणून चकित व्हाल. (PCB Central Contracts 2021-22: हसन अली आणि मोहम्मद रिझवान यांना बढती, पाकिस्तानच्या वार्षिक मानधन कराराची घोषणा)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केंद्रीय करारात तीन श्रेणी आहेत. यापैकी पहिल्या श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला फक्त 46 लाख रुपये मिळतात. तर ग्रेड बी खेळाडू 28 लाख आणि ग्रेड सी खेळाडू फक्त 19 लाख कमावतात. पाकिस्तान खेळाडूंची कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची फी खूप कमी आहे. पाकिस्तानी खेळाडूंना एका टेस्टसाठी 3.6 लाख रुपये मिळतात. तसेच एकदिवसीय सामन्यासाठी 2.2 लाख आणि एक टी-20 सामन्यात ते 1.6 लाख रुपये कमाई करतात. खेळाडूंसाठी करार श्रेणी ठरवताना सातत्य हा मुख्य घटक होता आणि हसन अलीच्या सर्व फॉरमॅटमध्ये अलीकडील कामगिरीकडे पाहून त्याला A करार देण्यात आला आहे. फी, मात्र, तीनही फॉरमॅटमध्ये समान राहिली असल्यामुळे पाकिस्तान A करारातील खेळाडू निराश आहेत आणि त्यांनी मॅच फीमध्ये वाढ करण्याची विनंती केली आहे.
जुलै महिन्यात पीसीबीने तीन उदयोन्मुख क्रिकेटपटूंसह 20 खेळाडूंसाठी कामगिरी-आधारित केंद्रीय करार यादी 2021-22 ची घोषणा केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने समान वितरण करण्याच्या प्रयत्नात ग्रेड ए करारात वाढ केली नाही आणि केवळ राखीव टक्केवारी 25 पर्यंत वाढवली होती. दरम्यान, अनुभवी अष्टपैलू मोहम्मद हफीजने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सी ग्रेड ऑफर नाकारली आहे. दरम्यान, वरिष्ठ खेळाडूंच्या मागणीवर पाकिस्तान बोर्ड काय निर्णय घेतो याकडे सर्व खेळाडूंचे लक्ष लागून असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)