PAK W vs NZ W, 2024 ICC Women's T20 World Cup Scorecard: न्यूझीलंडने पाकिस्तानचा 54 धावांनी केला पराभव, टीम इंडिया महिला T20 विश्वचषकातून बाहेर, पाहा सामन्याचे स्कोअरकार्ड.

पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आणि 11.4 षटकात केवळ 56 धावांत सर्वबाद झाले. सना फातिमाने संघासाठी सर्वाधिक 21 धावा केल्या, पण तिला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही.

Pakistan Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team Match Scorecard:  पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, 14 ऑक्टोबर (सोमवार) रोजी दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 2024 ICC महिला T20 विश्वचषकातील 19 वा सामना खेळला गेला. आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडच्या महिला संघाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानच्या महिला संघाचा 54 धावांनी पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 110 धावा केल्या, त्यानंतर पाकिस्तानचा संघ 56 धावांवरच बाद झाला. विजय मिळवून न्यूझीलंड संघाने पाकिस्तानसह टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुझी बेट्सने 28 धावा करत संघाला दमदार सुरुवात करून दिली, तर ब्रुक हॅलिडेने 22 धावांची खेळी केली. सोफी डेव्हिनने 19 धावा केल्या, मात्र इतर फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. पाकिस्तानच्या गोलंदाजीत नशरा संधूने चमकदार कामगिरी करत 18 धावांत 3 बळी घेतले. ओमामा सोहेलने 14 धावांत 1 बळी, तर सादिया इक्बालने 23 धावांत 1 बळी घेतला. निदा दारनेही एक विकेट घेतली

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे स्कोअरकार्ड:

  • न्यूझीलंड: 110/6 (20 ओवर)
  • पाकिस्तान: 56 (11.4 ओवर)

पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आणि 11.4 षटकात केवळ 56 धावांत सर्वबाद झाले. सना फातिमाने संघासाठी सर्वाधिक 21 धावा केल्या, पण तिला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. अमेलिया केरने न्यूझीलंडच्या गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत 2.4 षटकात 14 धावा देत 3 बळी घेतले. इडन कार्सनने 3 षटकांत 7 धावांत 2 बळी घेतले, लेह टाहू, रोझमेरी मायर, फ्रॅन जोनास यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 54 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement