PAK vs SL 2019 Series: प्रत्रकारने 'Tuk-Tuk' वर विचारलेल्या प्रश्नावर मिसबाह-उल-हक ने दिले 'हे' मजेदार उत्तर, Video

श्रीलंकाविरुद्ध पहिल्या वनडे मॅचआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हकला एका पत्रकारने  त्याला ‘तुक-तुक’ (धीम्या गतीने) फलंदाजीबद्दल विचारले. रिपोर्टरचा प्रश्न मिसबाहला काही पटला नाही आणि त्याने चावटपणे त्याला उत्तर दिले. मिसबाहने म्हटले की, 'एकतर त्याला गाडी मिळावी नाही किंवा त्याला कोणीतरी शिकवून पाठवले आहे की कोचला त्रास द्यायचाच आहे.

मिसबाह-उल-हक (Photo Credit: Getty)

पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक (Misbah Ul Haq) याला मिकी आर्थर यांच्या हकालपट्टी नंतर मुख्य प्रशिक्षक बनविण्यात आले आहे. त्यांच्या कोचिंग अंतर्गत पाकिस्तानी संघ श्रीलंकाविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 मालिकेत आमने-सामने येतील. विश्वचषकमधील निकृष्ट दर्जाच्या कामगिरीनानंतर ही संघाची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. शिवाय, तब्बल 9 वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानमध्ये खेळले जाईल. 2009 मध्ये श्रीलंका खेळाडूंवर दहशतवादी हल्ला झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास कोणताही संघाने तयारी दाखवली नाही. पण, आता क्रिकेटला श्रीलंका (Sri Lanka) संघाच्या दौऱ्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला देशात परत आणण्याचे हे प्रयत्न आहे. (IND vs PAK: टीम इंडिया आणि पाकिस्तान संघात द्विपक्षीय मालिकेबाबत CoA अध्यक्ष विनोद राय यांनी के 'हे' विधान)

दोन्ही संघातील पहिली वनडे उद्या, 27 सप्टेंबरला खेळली जाईल. याआधी मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान, एका पत्रकारने  त्याला ‘तुक-तुक’ (धीम्या गतीने) फलंदाजीबद्दल विचारले. रिपोर्टरचा प्रश्न मिसबाहला काही पटला नाही आणि त्याने चावटपणे त्याला उत्तर दिले. 45 वर्षीय कोचने पत्रकारला मजेदार उत्तर देत म्हटले की, 'एकतर त्याला गाडी मिळावी नाही किंवा त्याला कोणीतरी शिकवून पाठवले आहे की कोचला त्रास द्यायचाच आहे.' पहा याचा मजेदार व्हिडिओ:

दरम्यान, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कराची राष्ट्रीय स्टेडियमवर खेळाला जाईल. पाकिस्तानमधील सक्रिय दहशतवादी कारवायांमुळे कोणत्याही देशाने येथे क्रिकेट खेळायस मनाई केली. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर श्रीलंका टीमच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट अक्षरशः बंद झाले होते आणि तेव्हापासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्यांचे स्थानिक क्रिकेट सामने खेळण्यात येत आहेत. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी मंगळवारी सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्यांच्या घरच्या सामने खेळणे “यापुढे पर्याय ठरणार नाही”. देशातील सुधारित सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या खर्चात कपात करण्याचे उद्दीष्ट आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now