PAK vs ENG 3rd Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, पाकिस्तान संघ अजूनही 194 धावांनी मागे
तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. इंग्लंडने पहिली कसोटी सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकला. मात्र, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत यजमान संघाच्या नजरा तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला हरवून मालिका जिंकण्याकडे असतील.
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ तिसरा कसोटी सामना 25 ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. इंग्लंडने पहिली कसोटी सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकला. मात्र, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत यजमान संघाच्या नजरा तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला हरवून मालिका जिंकण्याकडे असतील. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 23 षटकात तीन गडी गमावून 73 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघ अजूनही 194 धावांनी मागे आहे. पाकिस्तानकडून शान मसूद नाबाद 16 आणि सौद शकील नाबाद 16 धावांवर खेळत आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार नाही. तथापि, FanCode ॲप आणि वेबसाइटवर भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेता येईल. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test 2024 Day 2 Live Streaming: जैस्वाल-गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा, भारत न्यूझीलंडच्या 243 धावांनी मागे; थोड्याच वेळात दुसऱ्या दिवसाच्या खेळाला होणार सुरुवात)
दोन्ही संघाची प्लेइंग 11
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), गस ऍटकिन्सन, रेहान अहमद, जॅक लीच, शोएब बशीर
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

