'Paaji, Teach Your Fast Bowler'! नवजोत सिंह सिद्धूने भर मैदानात बॅटने फटकावण्याची धमकी दिली होती? माजी पाकिस्तानी आमिर सोहेलने सांगितली सत्य कहाणी

सिद्धूने त्यावेळी आमिरला बॅटने मारण्याची धमकी दिली होती असे बोलले जात होते मात्र, प्रत्यक्षात काय घडले हे आता सोहेलने स्पष्ट केले.

आमेर सोहेल-नवजोत सिंह सिद्धू (Photo Credit: Getty/Facebook)

पाकिस्तानचे माजी कर्णधार आमेर सोहेल (Aamer Sohail) यांनी अलीकडेच भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात 1996 मध्ये झालेल्या पेप्सी कप सामन्यात भारताचा माजी फलंदाज नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्याशी झालेल्या भांडणाची आठवण सांगितली. सिद्धूने त्यावेळी आमिरला त्याच्या बॅटने फाटकावण्याची धमकी दिली होती असे बोलले जात होते मात्र, त्या खेळ सुरु असताना प्रत्यक्षात काय घडले हे आता सोहेलने स्पष्ट केले. सिद्धू काही वर्षांपूर्वी एका कॉमेडी शो मध्ये या घटनेविषयी उघडपणे बोलले तथापि, आमिरकडे कथेची भिन्न आवृत्ती आहे जी त्याने नुकतीच एका यूट्यूब व्हिडिओमध्ये उघड केली. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसच्या स्लेजींगमुळे सिद्धू खुश नसल्याचा दावा सोहेल यांनी केला आणि सोहेलला आपल्या गोलंदाजांना शिवीगाळ करु नये असे सिद्धू यांनी सांगितले होते. भारत-पाकिस्तानमधील हा सामना शारजाहमध्ये खेळला जात होता आणि सोहेल पाकिस्तानचे नेतृत्व करत होते. ('How Many Hundreds at Lord's Ya?' जेव्हा अजित आगरकरने रिकी पॉन्टिंग ला केले ट्रोल, माजी भारतीय क्रिकेटरने सांगितला मजेदार प्रसंग)

“1996 मध्ये मी शारजाह येथे भारताविरुद्ध सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व करत असताना ही घटना घडली. सिद्धू पाजी फलंदाजी करीत होते. ओव्हरच्या मधेच मला सिद्धूने बोलावून सांगितलं की तू तुझ्या वेगवान गोलंदाजाला (वकार युनिस) समजावून सांग. तो सारखी बडबड करतोय. मी विचारलं की नक्की काय झालं? त्यावर सिद्धू म्हणाला की तुझा गोलंदाज बडबड करून मला त्रास देतोय. त्यावर मी म्हटलं ‘पाजी, त्याकडे दुर्लक्ष करा.’ त्यावर सिद्धूने मला सांगितलं की त्याने बडबड केली तरी चालेल पण तो मला शिव्या देतोय आणि आक्षेपार्ह शब्द उच्चारतोय. ते त्याला बंद करायला सांग. ते ऐकून मी त्यांना सांगितलं की मी त्याला सामना संपला की समजावतो. तुम्ही आता त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि खेळावर लक्ष द्या.”

शारजाह येथे खेळल्या गेलेल्या पेप्सी कपच्या चौथ्या सामन्यात ही घटना घडली. सामन्यात सिद्धूने 117 चेंडूत शानदार 101 धावा केल्या आणि भारताने 305 धावांची धावसंख्या उभारली. सिद्धूऐवजी सामन्यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 118 धावांचा डाव खेळला. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ 277 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताने 28 धावांनी सामना जिंकला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif