विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

On This Day in 2019: भारताचा मर्यादित ओव्हरचा उपकर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 6 जुलै, 2019 रोजी श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) शंभरी धावसंख्येचा पल्ला गाठला व एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 5 शतके करण्याचा विक्रम नोंदवला. रोहितने टीम इंडियाच्या (Team India) अखेरच्या साखळी सामन्यात लीड्स येथे वर्ल्ड कप 2019 मधील पाचवे आणि त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील 27वे शतक झळकावत इतिहास रचला. या दरम्यान, श्रीलंकेचे दिग्गज कुमार संगकाराच्या (Kumar Sangakkara) स्पर्धेच्या एका आवृत्तीत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम शर्माने मागे टाकला. 2015 वर्ल्ड कप (World Cup) स्पर्धेत संगकाराने एकूण चार शतके ठोकली होती. एकदिवसीय सामन्यात त्याने 27 वे शतक झळकावत रोहितने इतिहास रचला. (On This Day in 2007: आजच्या दिवशी Sachin Tendulkar ने रचला होता इतिहास, वनडे क्रिकेटमध्ये हा कारनामा करणारा बनला पहिला क्रिकेटर)

दुसरीकडे, विश्वचषक कारकिर्दीतील रोहित शर्माचे हे सलग तिसरे शतक आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सह संयुक्त सर्वात 6वे शतक ठरले. आपल्या या खेळी दरम्यान रोहित विश्वचषक स्पर्धेत 600 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला. भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ या स्पर्धेत आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून त्याने 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 648 धावा काढल्या. श्रीलंका व्यतिरिक्त रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि बांग्लादेश संघाविरुद्ध देखील शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुध्द 57 धावांची मजबूत खेळी करण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 122 धावा ठोकल्या. त्यानंतर रोहितने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात 140 धावा केल्या मात्र अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात शर्माला शंभरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध 102 आणि बांग्लादेश विरोधात 104 धावा फटकावल्या.

दुसरीकडे, रोहितला सेमीफायनल सामन्यात आपल्या साखळी सामन्यातील फॉर्मची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला व न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या 1 धावांवर माघारी परतला. परंतु सचिन तेंडुलकर (673 - 2003 वर्ल्ड कप), आणि मॅथ्यू हेडन (659- 2007 वर्ल्ड कप) यांच्यानंतर वर्ल्ड कपच्या एकाच आवृत्तीत रोहितच्या 648 धावा तिसऱ्या सर्वाधिक ठरल्या.