On This Day: 'डेजर्ट स्टॉर्म' जेव्हा सचिन तेंडुलकर ने शारजाहमध्ये शेन वॉर्न ची केली धुलाई, 22 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात निर्माण केली दहशत
सचिनने ऑस्ट्रेलियाच्या मजबूत संघाविरूद्ध 131 चेंडूत 143 धावा केल्या. या शतकी डावात त्याने 9 चौकार आणि 5 षटकार लगावले. सचिनचा हा अविस्मरणीय डाव 'डेझर्ट स्टॉर्म' म्हणून ओळखला जातो.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या कारकीर्दीत अनेक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत, पण आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी त्याने असे एक शतक केलं, जे कदाचित एखादा भारतीय क्रिकेट चाहते विसरला असेल. भारतीय क्रिकेट (Indian Cricket) प्रेमींना सचिनच्या 1998 शारजाहमधील (Sharjah) डाव नक्की आठवला असेल जेव्हा सचिनने बॅटिंगने तुफान केला होता. हा सामना त्रिकोणी मालिकेचा भाग होता ज्यात भारतव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संघांचा समावेश होता. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी 22 एप्रिलला निर्णायक सामना जिंकणे आवश्यक होते. त्या सामन्यात शारज्याच्या मैदानावर सचिन नावाचे वादळ आले होते. सचिनने ऑस्ट्रेलियाच्या (Australia) मजबूत संघाविरूद्ध 131 चेंडूत 143 धावा केल्या. या शतकी डावात त्याने 9 चौकार आणि 5 षटकार लगावले. ऑस्ट्रेलियाने पहिले बॅटिंग करून माइकल बेवनच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 284 धावा केल्या. (सचिन तेंडुलकरचा सर्वोत्तम डाव: जेव्हा मास्टर ब्लास्टरने आपला आवडता शॉट न खेळता केल्या 241 धावा, त्याची शिस्त बनली सर्वांसाठी धडा)
शारजाहमध्ये वाळूचा वादळ आल्याने डकवर्थ लुइस नियमानुसार लक्ष्य छोटे करण्यात आले आणि अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना 46 ओव्हरमध्ये 237 धावांचे लक्ष्य मिळाले. आणि जेव्हा बाहेरचे वादळ थांबले तेव्हा मैदानात एक वादळ निर्माण झाले ज्यात ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाला उडविले आणि इतिहासाची नोंद केली. सचिनच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने कोका कोला चषक स्पर्धेत नेट रन रेटच्या जोरावर अंतिम फेरी गाठली. भारतीय फलंदाजाकडून नयन मोंगियाने दुसऱ्या सर्वाधिक 35 धावा केल्या. शेन वॉर्नला सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने 9 ओव्हरमध्ये 39 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
सचिनने आपला तुफानी डाव सुरू ठेवला आणि स्वबळावर संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. सचिनचा हा अविस्मरणीय डाव 'डेझर्ट स्टॉर्म' (Desert Storm)म्हणून ओळखला जातो. शिवाय, कांगारू संघाला स्वप्नातही हा स्फोटक डाव विसरणे कठीण आहे. तेंडुलकरने वॉर्नवर वर्चस्व गाजवल्याबद्दलही हा सामना लक्षात ठेवला जातो. दरम्यान, अंतिम सामन्यात देखील भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने आले होते. आणि सचिनच्या 134 धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेटने पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली.