On This Day: आजच्या दिवशी अल्जारी जोसेफ ने केली कारकीर्दीची सर्वोत्तम कामगिरी, 12 धावांवर 6 विकेट्स घेत IPL मध्ये रचला इतिहास (Video)
जोसेफने शानदार गोलंदाजी केली आणि 12 धावा देऊन 6 गडी बाद करत हैदराबादला बॅकफूटवर ठकलले. यावेळी त्याने आयपीएलचा तो रेकॉर्डही मोडला, जो गेल्या 12 वर्षांपासून कोणत्याही गोलंदाजाला मोडता आला नाही.
इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) 13 वे सत्र यंदा कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही आयपीएलची सर्वात यशस्वी टीम आहे. त्यांनी सर्वाधिक 4 वेळा आयपीएलच्या जेतेपदाची मान मिळवला आहे. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सनथ जयसूर्या, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड यासारखे दिग्गज या फ्रॅन्चायसीकडून खेळले आहेत. पण, मागील वर्षी आजच्याच दिवशी अशा एका खेळाडूने डेब्यू केले ज्याने पहिल्याच खेळात कमालीची गोलंदाजी केली. आणि तो म्हणजे वेस्ट इंडिजचा युवा गोलंदाज अल्जारी जोसेफ (Alzarri Joseph). 23 वर्षीय जोसेफ विंडीजकडून वनडे आणि टेस्ट सामने खेळला आहे. जोसेफने आपला पहिला आयपीएल सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) खेळला. या सामन्यात या कॅरेबियन खेळाडूने कहर केला की या स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ असलेल्या सनरायझर्सला 100 धावांचा टप्पादेखील गाठता आला नाही. अल्जारीच्या करिष्मामुळे मुंबईने आयपीएलच्या 19 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 40 धावांनी पराभूत केले. (रोहित शर्माची मुलगी समायराने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करत जिंकली यूजर्सची मनं, पाहा व्हायरल व्हिडिओ)
मागील वर्षी आजच्याच दिवशी झालेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादला फक्त 137 धावांचे लक्ष्य दिले होते. पण, जोसेफने शानदार गोलंदाजी केली आणि 12 धावा देऊन 6 गडी बाद करत हैदराबादला बॅकफूटवर ठकलले. यावेळी त्याने आयपीएलचा तो रेकॉर्डही मोडला, जो गेल्या 12 वर्षांपासून कोणत्याही गोलंदाजाला मोडता आला नाही. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरचा (Sohail Tanvir) 14/6 रेकॉर्ड मोडत अल्जारीने नवीन विक्रम रचला. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड त्याने डेब्यू सामन्यातच मोडला. पाहा हा व्हिडिओ:
मुंबई इंडियन्सने अल्जारीला 75 लाखात खरेदी केले होते, मात्र पुढील सामन्यात त्याला दुखापत झाल्याने स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्याजागी मुंबई फ्रॅन्चायसीने वेगवान दक्षिण आफ्रिकी गोलंदाज ब्युरन हेन्ड्रिक्सचा टीममध्ये समावेश केला. जोसेफने 2016 भारत दौऱ्यावरील टेस्ट सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आणि त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला.