On This Day: 27 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 23 वर्षीय शेन वॉर्न याने टाकला 'बॉल ऑफ द सेंचुरी', पाहा तो हैरान करणारा चेंडू (Watch Video)

27 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी दिग्गज शेन वॉर्न याने असा एका चेंडू फेकला ज्याला आज आपण 'बॉल ऑफ द सेंचुरी' नावाने ओळखतो.

शेन वॉर्न बॉल ऑफ द सेंचुरी (Photo Credit: Twitter/ICC)

4 जून, 1993 ही तारीख क्रिकेट प्रेमींच्या सदैव स्मरणात राहण्यासारखी आहे. 27 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी फिरकी दिग्गज शेन वॉर्न (Shane Warne) याने असा एका चेंडू फेकला ज्याला आज आपण 'बॉल ऑफ द सेंचुरी' (Ball of The Century) नावाने ओळखतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 143 वर्षांच्या इतिहासात, अनेक गोलंदाजांनी काही संस्मरणीय चेंडू टाकले आहेत, परंतु वॉर्नच्या चेंडूला शतकाचा चेंडू असे म्हणतात. आजच्या दिवशी इंग्लंडविरुद्ध पहिली अ‍ॅशेस कसोटी खेळत असलेल्या वॉर्नला त्याच्या खास बॉलमुळे आजचा दिवस ओळखला जाईल असा कधी विचार केला नसेल. वॉर्नने टाकलेला चेंडू चांगला हातभर काटकोनात वळत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज माईक गेटिंग यांची दांडी गुल केली. इंग्लंडच्या (England) ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे खेळल्या गेलेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करत अवघ्या 289 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने शानदार सुरुवात केली, पण चेंडू वॉर्नच्या हातात येताच वॉर्नने असा एक चेंडू टाकला ज्याने जगाला चकित केले. (भारतविरुद्ध खेळल्या सर्वोत्तम XI ची शेन वॉर्न ने केली निवड; सौरव गांगुली कर्णधार तर लक्ष्मण, धोनी आणि विराट कोहलीला वगळले)

चेंडूला फ्लाइट आणि स्पिन करणाऱ्या वॉर्नने इंग्लंड फलंदाज गेटिंगसमोर लेग-ब्रेक चेंडू टाकला, पण वॉर्नची फिरकी कला, एका बाजूला खेळपट्टीचा आद्रता आणि चेंडूची चमकने आश्चर्यकारक कामगिरी केली की चेंडू लेग स्टंपवर बसला आणि गेटिंगचा ऑफ स्टंप उडाला. वॉर्नने टाकलेला चेंडू इतका अप्रतिम होता की समीक्षकांकडे त्याचे वर्णन करण्यासाठी शब्दही कमी पडत होते. गेटिंग आणि वॉर्न यांच्यासह स्टेडियममध्ये बसलेल्या प्रत्येकाला हा चेंडू पाहून स्तब्ध झाले. पाहा 'त्या' हैरान करणाऱ्या चेंडूची एक झलक:

'बॉल ऑफ द सेंचुरी'नंतर वॉर्नचे नाव क्रिकेट विश्वात अमर झाले. या बॉलने वॉर्नला काही मिनिटातच स्टार बनविले. वॉर्नने या चेंडूबद्दल एक अतिशय रंजक गोष्ट सांगितली होती. वॉर्नने एका मुलाखतीत सांगितले की, असा चेंडू तो फेकू शकतो असे त्याला कधीच वाटले नव्हते. कसोटी क्रिकेटमध्ये 700 हून अधिक विकेट घेणाऱ्या वॉर्नने 'बॉल ऑफ द सेंचुरी'चे वर्णन आपल्या आयुष्यातील सर्वात खास क्षण म्हणून केले आहे.



संबंधित बातम्या