NZ vs WI 2020: न्यूझीलंडची पाकिस्तान संघाला चेतावणी, Quarantine नियम मोडल्यास घर परत पाठवू; शोएब अखेरने NZC ला सुनावलं
सदस्यांच्या दुर्लक्षामुळे न्यूझीलंडचे आरोग्य विभाग आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात त्यांनी पाकिस्तानी संघालाही कडक चेतावणीही दिली आहे. यावर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आक्षेप घेतला.
न्यूझीलंड (New Zealand) दौर्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी (Pakistan Cricket Team) आतापर्यंत कोणतीही चांगली बातमी आलेली नाही. न्यूझीलंडमध्ये केलेल्या कोरोना टेस्टमध्ये दौऱ्यावरील सहा सदस्यांना व्हायरसची (Coronavirus) सकारात्मक लागण झाल्याचे समोर आले आहे. संघाला येथे टी -20 आणि कसोटी मालिका खेळायच्या आहेत, पण मालिका सुरू होण्यापूर्वीच एक-दोन नव्हे तर सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सध्या खळबळ उडाली आहे. त्याचवेळी पाक संघातील सदस्यांच्या दुर्लक्षामुळे न्यूझीलंडचे आरोग्य विभाग आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (New Zealand Cricket) चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात त्यांनी पाकिस्तानी संघालाही कडक चेतावणीही दिली आहे. न्यूझीलंड सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांना सांगितले आहे की जर पाकिस्तानच्या पथकाने पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केले तर ते संपूर्ण टीमला मायदेशी पाठवण्यात येईल. (New Zealand दौऱ्यावर गेलेल्या Pakistan संघाचे 6 सदस्य कोरोना पॉसिटीव्ह, आयसोलेशन दरम्यान होणाऱ्या सराव सत्रावरही लागले निर्बंध)
दरम्यान, न्यूझीलंड बोर्डाच्या चेतावणीवर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आक्षेप घेतला. ते म्हणाले की न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या चुकांमुळे पाकिस्तानी खेळाडूंना लागण झाली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने हा दौरा रद्द करण्याच्या माहितीवर ते म्हणाले, "न्यूझीलंडने बिलो द बेल्ट (अगदी खालच्या पातळी) बोलले आहेत. हा एक क्लब संघ नाही, ज्यावर आपण असे कठोर विधान करत आहात. हा पाकिस्तानचा राष्ट्रीय संघ आहे." अख्तर इथपर्यत थांबला नाही आणि पुढे म्हणाला की, "पाकिस्तान संघाचे आभारी असले पाहिजे की ते या प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही इथे क्रिकेट खेळायला आलात आणि तुम्ही बेजबाबदार विधाने करत आहात. तेथे क्रिकेट सुरू झाल्यापासून तुम्हाला फायदा होणार आहे. आपण पैसे कमवाल, आम्ही नाही."
न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील सहा सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केली. टीममधील काही सदस्यांनी "व्यवस्थापित क्वारंटाइनच्या पहिल्या दिवशी प्रोटोकॉलचे उल्लंघन केले होते" असे म्हटले जात आहे. दरम्यान या सर्वांना सध्या Christchurch मधील एका सुविधागृहात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत.