IPL Auction 2023, How To Download Jio Cinema App: आता आयपीएल लिलावाचा आनंद घ्या घरी बसून, Jio Cinema App डाउनलोड करुन पहा लाइव्ह स्ट्रीमिंग

Jio Cinema हे Jio नेटवर्कचे OTT प्लॅटफॉर्म आहे आणि आयपीएल लिलाव स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केले जात आहे आणि Jio Cinema हा IPL लिलाव 2023 चा लाइव्ह स्ट्रीमिंग पार्टनर आहे.

IPL Auction 2023 (Photo Credit - File Photo)

IPL Auction 2023: आयपीएल 2023 (IPL 2022) चा लिलाव आज कोची (Kochi) येथे होणार आहे. चाहते ऑनलाईन जिओ सिनेमाद्वारे आयपीएल लिलावाचा आनंद घेऊ शकतात. Jio Cinema हे एक ऑनलाइन डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्म आहे जे त्याच्या वापरकर्त्यांना त्याच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर क्रीडा इव्हेंट, चित्रपट, बातम्या आणि बरेच काही पाहण्याची आणि थेट प्रेक्षेपण करण्याची परवानगी देते. Jio Cinema हे Jio नेटवर्कचे OTT प्लॅटफॉर्म आहे आणि आयपीएल लिलाव स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केले जात आहे आणि Jio Cinema हा IPL लिलाव 2023 चा लाइव्ह स्ट्रीमिंग पार्टनर आहे. आयपीएल लिलावाचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी आणि सामने थेट पाहण्यासाठी चाहते त्यांच्या स्मार्टफोनवर Jio Cinema अॅप डाउनलोड करू शकतात.

अँड्रॉईड फोन वापरकर्ते Google Play Store वरून Jio Cinema डाउनलोड करू शकतात. तर Jio Cinema Apple च्या App Store वर उपलब्ध आहे. अँड्रॉइड फोन वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनवर जिओ सिनेमा अॅप दोन प्रकारे डाउनलोड करू शकतात. पहिला पर्याय म्हणजे Playstore वरून अॅप डाउनलोड करणे, तर दुसरा पर्याय म्हणजे वेब ब्राउझरवरून Jio Cinema APK डाउनलोड करणे आणि ते स्थापित करणे. (हे देखील वाचा: IPL Auction 2023: यावेळी लिलाव असेल खास, 10 फ्रँचायझींकडे 87 स्लॉटसाठी आहे इतके कोटी; जाणून घ्या लिलावाशी संबंधित खास गोष्टी)

तुमच्या मोबाईल फोनवर JioCinema कसे डाउनलोड करणार?

1- मोबाईलमध्ये Jio Cinema अॅप डाउनलोड करणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जा आणि तिथे Jio Cinema सर्च करा.

2- यानंतर install पर्यायावर जा आणि तुमच्या फोनमधील Install App वर क्लिक करा.

3- एकदा इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला तुमच्या अॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर Jio Cinema अॅप आयकॉन दिसेल.

4- यानंतर तुम्ही तुमच्या Gmail किंवा फोन नंबरने साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन साइन अप करून अॅप उघडू शकता.

5- तुम्ही साइन इन करताच, तुम्ही Jio सिनेमावर थेट व्हिडिओ, IPL सारखे क्रीडा कार्यक्रम, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

दिग्गज खेळाडू लिलावात

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी आज कोचीमध्ये मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. हा लिलाव दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे. कोची हा लिलाव आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. त्याचवेळी या लिलावात सहभागी होण्यासाठी सर्व 10 फ्रँचायझींचे प्रतिनिधीही कोचीला पोहोचले आहेत. यावेळी मयंक अग्रवाल, बेन स्टोक्स, सॅम करण असे दिग्गज खेळाडू लिलावात सहभागी होत आहेत. हे खेळाडू कोणत्या संघात सामील होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ सिनेमावर कोची येथे होणारा आयपीएल लिलाव थेट पाहता येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रत्येकजण आयपीएल लिलावाची वाट पाहत आहे.