'विदेशी टी-20 लीगसाठी NOC मिळणार नाही'; युवराज सिंह याच्या विशेष सवलतीमुळे CoA आणि BCCI यांच्यात वाद
टीम इंडियाचा माजी 'सिक्सर किंग' ओळख असेल युवराज सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती केल्यानंतर कॅनडाच्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये सहभागी झाला होता. मात्र, आता युवराजच्या विदेशी लीगमध्ये खेळण्यावरून बीसीसीआय आणि प्रशासकीय समिती यांच्यात मदभेद होत आहेत. सीओए म्हणते की युवराजचे प्रकरण एक अपवाद होते आणि ते इतर कोणालाही विदेशी देशात टी-20 लीग खेळण्यासाठी एनओसी देणार नाही.
टीम इंडियाचा माजी 'सिक्सर किंग' ओळख असेल युवराज सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर, तो कॅनडामध्ये होत असलेल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये सहभागी झाला होता. मात्र, आता युवराजच्या विदेशी लीगमध्ये खेळण्यावरून बीसीसीआय आणि प्रशासकीय समिती यांच्यात मदभेद होत आहेत. युवराजने ग्लोबल टी-20 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर त्याने टोरंटो नॅशनल्स संघाचे कर्णधारपद स्विकारले. दरम्यान युवराजला परवानगी मिळाल्यामुले आयात इतर खेळाडूदेखील विदेशी लीगमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. आणि आता प्रशासकीय समितीनं मात्र याबाबत वेगळे मत व्यक्त केले आहे. (Ind vs WI: 'विराट कोहली'चं 43 वे एकदिवसीय शतक; Ricky Ponting ला मागे सारत रचलेल्या नव्या विक्रमाचं, झुंजार खेळीचं Twitter वर कौतुक)
सीओए म्हणते की युवराजचे प्रकरण एक अपवाद होते आणि ते इतर कोणालाही विदेशी देशात टी-20 लीग खेळण्यासाठी एनओसी देणार नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सीओए सदस्याने सांगितले की, "युवराजचे प्रकरण ही वेगळी बाब आहे. ते अपवाद आहे. आम्ही इतर कोणत्याही खेळाडूला परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी एनओसी देणार नाही. आम्ही या विषयावर चर्चा केली आहे आणि यावर निर्णय घेण्याची गरज नाही असा निर्णय घेतला आहे."
सीओएच्या या निर्णयाने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे आणि म्हणाले की एखाद्या निर्णयामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे आणि एखाद्या खेळाडूला एनओसी दिल्यानंतर धोरण बदलू नये. बोर्डच्या एका अधिकाऱ्यानं मत व्यक्त म्हणाले की, "जेव्हा खेळाडू आणि त्यांच्या कारकीर्दीचा विचार केला जातो तेव्हा कोणतीही मनमानी वृत्ती असू शकत नाही. असे बरेच खेळाडू आहेत जे यापुढे भारतीय संघात सहभागी होऊ शकणार नाहीत कारण ते बोर्डाच्या धोरणात नाही आणि असे खेळाडू आता निवृत्तीबद्दल विचार करतील जेणेकरून ते परदेशी लीगमध्ये खेळू शकतील."
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)