MS Dhoni's Daughter Ziva Gets Threats: CSKच्या पराभवानंतर एमएस धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करण्याची धमकी, इरफान पठाणने दिले सडेतोड उत्तर
धोनीची मुलगी झिवावर करण्यात आलेल्या टिप्पणीचा निषेध भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने केला आहे.
MS Dhoni's Daughter Ziva Gets Threats: आयपीएलच्या (IPL) या हंगामात महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) कामगिरी धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी सोशल मीडियावर ट्रोलने धोनीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. धोनीच्या पराभवाचा राग आल्याने स्वत:ला चाहते म्हणणाऱ्या काही विकृत लोकांनी मर्यादा ओलांडल्या आणि धोनीची 5 वर्षाची गोंडस मुलगी झिवावर (Ziva) बलात्कार करण्याची धमकी दिली. विजय किंवा पराभवानंतर आपल्या आवडत्या खेळाडूंविषयी प्रेम, संताप, नाराजी अशा भावना व्यक्त करण्यासाठी विकृत वर्तन करण्याचा इशारा देण्याचे प्रमाणही सध्या सोशल मीडियावर वाढत जात आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2020 मध्ये अनुभवी धोनीच्या उदासीन कामगिरीनंतर त्याची मुलगी झिवावर करण्यात आलेल्या टिप्पणीचा निषेध भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने (Irfan Pathan) केला आहे. (MS Dhoni’s Daughter Ziva Gets Rape Threats: KKR कडून पराभूत झाल्यानंतर CSK कर्णधार एमएस धोनीच्या 5 वर्षाची मुलीगी झिवाला बलात्काराची धमकी)
टीमच्या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहते केवळ खेळाडूंनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही शिवीगाळ करताना अनेकदा दिसले आहे, पण आता तर काहींनी चक्क विकृतीचा कळस गाठला. “सर्व खेळाडू आपले सर्वोत्तम देतात, काहीवेळा ते यशस्वी होतात तर काही वेळा नाही परंतु ते तुम्हाला कोणा एकास लहान मुलास धमकावण्याचा अधिकार देत नाही,” इरफानने ट्विटरवर पोस्ट शेअर करत सडेतोड उत्तर दिलं.
दरम्यान, सीएसकेने आजवर आयपीएलमध्ये खेळलेल्या 6 सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवला असून 5 सामन्यात त्यांना प्रभाव पत्करावा लागला आहे. यासह सीएसकेची यंदा आयपीएलचे प्ले-ऑफ गाठण्याची शक्यता देखील फिकी पडत आहे. यंदा धोनीचा संघ विजेतेपदाचा दावेदार असल्याचा मानला जात होता, तथापि जर-पराजय हा खेळाचा एक भाग आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 वर्ल्ड कप, टी-20 चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्ड कप यांसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. शिवाय, धोनीने नाके सामन्यात जबरदस्त खेळ करून प्रतिस्पर्ध्यांच्या हातून विजय हिसकावूनही आणला, पण या सगळ्या गोष्टी विसरुन धोनीला आयपीएलमधील पराभवासाठी दोषी ठरले गेले असून त्याच्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणे अत्यंत घृणास्पद आहे.