SA W vs NZ W Dream11 Team Prediction: दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात सर्वोत्तम ड्रीम 11 कशी निवडाल? जाणून घ्या
या टीमसोबत तुम्ही तुमच्या फॅन्टसी टीमला ड्रीम टीम बनवू शकता.
New Zealand Women National Cricket Team vs South Africa Women National Cricket Team Dream11 Team Prediction: न्यूझीलंड संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका (NZvsSA)संघात 2024 आयसीसी महिला टी 20 विश्वचषकासाठी अंतिम सामना(Women's T20 World Cup 2024 Final) ()होणार आहे. सामना 20 ऑक्टोबर रोजी रविवारी खेळवला जाणार आहे. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. परंतू लॉरा वोल्वार्ड आणि तिची टीमदेखील देखील आत्मविश्वासाने भरलेली आहे. दरम्यान, न्यूझीलंड महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला संघाचे ड्रीम 11 कोण असेल जाणून घेऊयात.
सामना सुरू होण्यापूर्वी विजेता निवडणे कदाचित कठीण असेल. परंतु तो संघ चांगली कामगिरी करेल त्या संघाला विजयाची चव चाखता येणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार गेम जिंकले आहेत. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हेड-टू-हेड रेकॉर्ड न्यूझीलंडच्या बाजूने आहेत. दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या 16 पैकी 11 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.(हेही वाचा: Happy Birthday Virender Sehwag: वीरेंद्र सेहवागचा 46 वा वाढदिवस; बीसीसीआयसह आयपीएल फ्रँचायझींकडून शुभेच्छाचा वर्षाव)
सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिजने कॅप, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.
न्यूझीलंड संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आयसीसी महिला टी 20 विश्वचषक ड्रीम11 संघ अंदाज: विकेटकीपर- इसाबेला गझ (न्यूझीलंड ) ची यष्टीरक्षक म्हणून निवड केली जाऊ शकते.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आयसीसी महिला टी 20 विश्वचषक ड्रीम11 संघ अंदाज: फलंदाज- लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका), तझमिन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका), सुझी बेट्स (न्यूझीलंड) यांना न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका महिला ड्रीम11 संघात स्थान दिले जाऊ शकते.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आयसीसी महिला टी 20 विश्वचषक ड्रीम11 संघ अंदाज: अष्टपैलू खेळाडू- मारिजने कॅप(दक्षिण आफ्रिका), क्लो ट्रायॉन(दक्षिण आफ्रिका), अमेलिया केर(न्यूझीलंड), सोफी डेव्हाईन(न्यूझीलंड) न्यूझीलंड महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला सामन्यासाठी ड्रीम11 फॅन्टसी टीममध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून जोडल्या जाऊ शकतात.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आयसीसी महिला टी 20 विश्वचषक ड्रीम11 संघ अंदाज: गोलंदाज- नॉनकुलुलेको म्लाबा(दक्षिण आफ्रिका), अयाबोंगा खाका(दक्षिण आफ्रिका), ईडन कार्सन(न्यूझीलंड) तुमच्या न्यूझीलंड महिला-दक्षिण आफ्रिका महिला ड्रीम11 फॅन्टसी टीम.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आयसीसी महिला टी 20 विश्वचषक ड्रीम11 संघ अंदाज: इसाबेला गझ(न्यूझीलंड), लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका), तझमिन ब्रिट्स, सुझी बेट्स(न्यूझीलंड ), मारिजने कॅप(दक्षिण आफ्रिका) , क्लो ट्रायॉन (दक्षिण आफ्रिका), अमेलिया केर (न्यूझीलंड), सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड), नॉनकुलुलेको म्लाबा (दक्षिण आफ्रिका), अयाबोंगा खाका (दक्षिण आफ्रिका), ईडन कार्सन (न्यूझीलंड)