New Zealand Women Beat West Indies Women, 2nd Semi Final Scorecard: न्यूझीलंडने रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडिजचा 8 धावांनी केला पराभव, 20 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार विजेतेपदाची लढत

यानंतर कर्णधार हेली मॅथ्यूज आणि स्टॅफनी टेलरने मिळून डाव सांभाळला. वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 120 धावा करू शकला.

न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (Credit: X/@WHITE_FERNS)

New Zealand Women National Cricket Team vs West Indies Women National Cricket Team, 2nd Semi-Final Match Scorecard:  न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 2024 ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील  (2024 ICC Womens T20 World Cup)  दुसरा उपांत्य सामना आज पार पडला. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील (Sharjah)  शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium)  खेळला गेला. वेस्ट इंडिजची (West Indies)  कमान हेली मॅथ्यूजच्या  (Hayley Matthews) हाती तर न्यूझीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाईन (Sophie Devine) करत होती.

दरम्यान, स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 128 धावा केल्या.  (हेही वाचा -  West Indies Women vs New Zealand Women, 2nd Semi Final 1st Inning Scorecard: वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला 128 धावांवर रोखले, डिआंड्रा डॉटिनने 4 बळी घेतले; येथे पहा WI W विरुद्ध NZ W सामन्याच्या पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड)

पाहा पोस्ट -

 

न्यूझीलंडसाठी सलामीवीर जॉर्जिया प्लिमरने सर्वाधिक 33 धावांची खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान जॉर्जिया प्लिमरने 31 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. जॉर्जिया प्लिमरशिवाय सलामीवीर सुझी बेट्सने 26 धावा केल्या.

करिश्मा रामहारिकने वेस्ट इंडिज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. वेस्ट इंडिजकडून डिआंड्रा डॉटिनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. डिआंड्रा डॉटिनशिवाय आफी फ्लेचरने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला 20 षटकात 129 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 20 धावांवर संघाला दोन मोठे धक्के बसले. यानंतर कर्णधार हेली मॅथ्यूज आणि स्टॅफनी टेलरने मिळून डाव सांभाळला. वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 120 धावा करू शकला. वेस्ट इंडिजकडून डिआंड्रा डॉटिनने सर्वाधिक 33 धावांची खेळी खेळली. डिआंड्रा डॉटिनशिवाय अफी फ्लेचरने नाबाद धावा केल्या.

ईडन कार्सनने न्यूझीलंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. न्यूझीलंडकडून इडन कार्सनने सर्वाधिक तीन बळी घेतले. इडन कार्सनशिवाय अमेलिया केरने दोन बळी घेतले. रविवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी एक नवीन विजेता असेल.

Tags