New Zealand Beat Sri Lanka, 2nd T20I Match Scorecard: दुसऱ्या T20 सामन्यात, न्यूझीलंडने श्रीलंकेचा 45 धावांनी केला पराभव, जेकब डफीची शानदार गोलंदाजी, मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी
यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, 2nd T20I Match Scorecard: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना (T20 Series) आज म्हणजेच 30 डिसेंबर रोजी खेळला गेला. उभय संघांमधला हा सामना माउंट माउंगानुई (Mount Maunganui) येथील बे ओव्हल स्टेडियमवर (Bay Oval Stadium) खेळला गेला. दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या (Mitchell Santner) खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका (Charit Asalanka) करत आहे. (हेही वाचा - AUS Beat IND 4th Test 2024 Day 5 Scorecard: मेलबर्न कसोटीत भारताचा 13 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी मिळवला विजय; मालिकेत 2-1 घेतली अशी आघाडी)
येथे NZ विरुद्ध SL सामन्याचे स्कोअरकार्ड पहा:
तत्पूर्वी, दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 13 धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला मोठा धक्का बसला. न्यूझीलंड संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 186 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमनने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान मार्क चॅपमनने 29 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. मार्क चॅपमनशिवाय टीम रॉबिन्सन आणि मिचेल हे यांनी 41-41 धावा केल्या.
दुसरीकडे, नुवान तुषाराने श्रीलंकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक दोन बळी घेतले. वानिंदू हसरंगाशिवाय नुवान तुषारा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 20 षटकात 187 धावा करायच्या आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाने चांगली कामगिरी केली आणि दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 32 धावा फलकावर लावल्या. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19.1 षटकात अवघ्या 141 धावांवर गारद झाला. श्रीलंकेसाठी स्टार फलंदाज कुसल परेराने सर्वाधिक 48 धावांची खेळी खेळली. कुसल परेराशिवाय पथुम निसांकाने 37 धावा केल्या.
कर्णधार मिचेल सँटनरने न्यूझीलंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज जेकब डफीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जेकब डफीशिवाय मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २ जानेवारी रोजी सकाळी ५.४५ वाजता नेल्सन येथील सॅक्सटन ओव्हल मैदानावर खेळवला जाईल.