IPL Auction 2025 Live

NED Beat SA, ICC World Cup 2023: विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर; नेदरलँडची साऊथ आफ्रिकेवर 38 धावांनी मात

कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने नाबाद 78 धावांची सर्वोत्तम खेळी केली.

अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करत यंदाच्या विश्वचषकात पहिला उलटफेर केल्यानंतर आता दुसरा उलटफेर नेदरलँड्सचा संघाने केला आहे. नेदरलँड्सने तगड्या दक्षिण आफ्रिकेचा आजच्या सामन्यात 38 धावांनी पराभव केला आहे. पावसामुळे नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 43 षटकांचा करण्याचा निर्णय पंचांनी घेतला होता. 43 षटकांमध्ये नेदर्लंड्स संघाने 8 बाद 245 धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने नाबाद 78 धावांची सर्वोत्तम खेळी केली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 247 धावांचे आव्हान दिले होते.  दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडने 207 धावांनर ऑल आऊट केले. (हेही वाचा -'Om' Written On Keshav Maharaj's Bat: दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूच्या बॅटवर लिहलेय ॐ, आहे भगवान रामाचा मोठा भक्त)

पाहा पोस्ट -

247 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरल्यानंतर नेदरलँडच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना मैदानात टिकू दिले नाही. या सामन्यात नेदरलँडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत आफ्रिकेला धावांवर रोखले आणि या विश्वचषकातील पहिला विजय साकारला. या आफ्रिकन इनिंगमध्ये मिलर (43) वगळता कोणीच चांगली खेळी साकरु शकले नाही. दक्षिण आफ्रिकेचा हा या विश्वचषकातील पहिला पराभव ठरला आहे. या पराभवामुळे विश्वचषकातील क्रमवारीत देखील मोठा उलटफेर झाला आहे. केशब महाराजने शेवटी आफ्रिकेकडून 40 धावा करत मॅच शेवट पर्यंत लढवत ठेवली.

धरमशाला स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे दक्षिण आफ्रिका आणि नेदर्लंड्स यांच्यातील हा सामना  43 षटकांचा करण्याचा निर्णय पंचांनी घेतला होता.