Mzansi Super League 2019: डेल स्टेन याने एबी डिव्हिलियर्स याला मजेशीरपणे केले रन-आऊट, पाहून तुम्हालाही येईल हसू, पाहा व्हिडिओ

मॅचदरम्यान स्टेन मस्तीच्या मूडमध्ये धावताना दिसला. डीव्हिलियर्स आणि स्टेनचा हा विनोद चाहत्यांना आवडला आणि चाहत्यांनी त्यास 'मोमेंट ऑफ द डे' म्हटले.

एबी डिव्हिलियर्स आणि डेल स्टेन (Photo Credit: YouTube)

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आणि वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) यांच्यात केपटाऊनमधील मझांसी सुपर लीग (Mzansi Super League) दरम्यान एक मजेदार घटना पाहायला मिळाली. टूर्नामेंटच्या 22 व्या सामन्यात केपटाऊन ब्लीटझ आणि श्वेन स्पार्टन्स यांच्यातील सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. ही हास्यास्पद घटना स्पार्टन्सचा फलंदाज डिव्हिलियर्स आणि केपटाऊनचा गोलंदाज स्टेन यांच्यादरम्यान झाली. मॅचदरम्यान स्टेन मस्तीच्या मूडमध्ये धावताना दिसला. डीव्हिलियर्स आणि स्टेनचा हा विनोद चाहत्यांना आवडला आणि चाहत्यांनी त्यास 'मोमेंट ऑफ द डे' म्हटले. अनेक वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना डिव्हिलियर्स आणि स्टेनने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. दक्षिण आफ्रिकेसाठी हे दोघे सर्वात महत्वाचे खेळाडू होते. डिव्हिलियर्स संघाच्या फलंदाजीचा मुख्य आधार होता, तर स्टेन गोलंदाजीचा कार्यभार सांभाळत होता आणि दोघांनीही आपले काम पूर्णत्वास नेले. यासह फ्रेंचचायझी क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा दोघे एकमेकांविरुद्ध खेळले तेव्हाही त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. (Mzansi Super League 2019: फलंदाजाला आऊट न दिल्याने क्रिस गेल याला लहान मुलासारखे रडताना पाहून अंपायरलाही आले हसू, पाहा Video)

अलीकडेच मझांसी प्रीमियर लीगमध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात होते आणि पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाले. 22 व्या सामन्यादरम्यान दोघांनी खेळपट्टीवरील त्यांच्या कृतीने सर्वांना हसवले. 14 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जेव्हा डिव्हिलियर्सने स्टेनची चेंडू त्याच्याकडे आणला तेव्हा ही घटना घडली. डिव्हिलियर्सने स्टेनचा चेंडू मारला आणि त्याने तो रोखला. डीव्हिलियर्सने स्वत: चेंडू उचलला आणि स्टेनला दिला. स्टॅनने मजा करत चेंडू स्टंपच्या दिशेने टाकला आणि अंपायरकडे रनआऊटसाठी अपील केले. दोघांदरम्यान ही थट्टा चालूच होती. ट्विटरवर या दोन्ही खेळाडूंचा हा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पाहा इथे:

2004 मध्ये या दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र पदार्पण केले होते. दोघांमध्ये खूप चांगले संबंध आहेत. मॅचबद्दल बोलले तर, 158 धावांचा पाठलाग करताना स्पार्टन्स संघ 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 142 धावा करू शकला आणि 15 धावांनी सामना गमावला. स्टेनने 4 ओव्हरमध्ये 10 धावांवर 3 गडी बाद केले. स्टेनने डिव्हिलियर्सला 31 धावांवर बाद केले. डीव्हिलियर्सला स्टॅनने स्वत: कॅच आऊट केले.