Mumbai Power Cut: मुंबई आणि MMR भागात विद्युत पुरवठा खंडित, जोफ्रा आर्चरच्या 7 वर्ष जुन्या ‘लाईट आऊट’ ट्विटवर नेटिझन्सच्या मजेदार प्रतिक्रिया

नेहमी झगमगाट असणाऱ्या देशाच्या आर्थिक राजधानीची आज बत्तीच गुल झाली. आणि यानंतर राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे सात वर्षांचे ट्वीट ट्विटरवर व्हायरल झालेले सोशल मीडियावर दिसुन येत आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने 2013 दरम्यान 'लाइट आउट' असे ट्विट केले असून लोक मुंबईतील खंडित झालेल्या वीज पुरवठ्याशी जोडून पाहत आहे.

मुंबई पॉवर कटवर जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी (Photo Credits: File Image)

Mumbai Power Cut: नेहमी झगमगाट असणाऱ्या देशाच्या आर्थिक राजधानीची आज बत्तीच गुल झाली. आणि यानंतर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) जो त्याच्या भविष्यवाणीच्या ट्वीटसाठी प्रसिद्ध आहे त्याचे आणखीन एक ट्विट व्हायरल झाले. अलीकडेच आर्चरचे मुंबईच्या पॉवर कट (Mumbai Electricity Failure) बाबत सात वर्षांचे ट्वीट ट्विटरवर व्हायरल झालेले सोशल मीडियावर दिसुन येत आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने 2013 दरम्यान 'लाइट आउट' (Light Out) असे ट्विट केले असून सकाळपासूनच मुंबई आणि महानगर प्रदेशात खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे या ट्विटरटीने सर्वांचे लक्ष वेधले. ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या आर्चरच्या या ट्विटमध्ये 'लाइट्स आऊट' असे दोनच शब्द लिहिले आहेत, जे लोक मुंबईतील (Mumbai) खंडित झालेल्या वीज पुरवठ्याशी जोडून पाहत आहे. (Mumbai Power Cut Update: मुंबई व परिसरातील वीजपुरवठा एक तासात पूर्ववत होण्याची शक्यता, युद्धपातळीवर काम सुरु- उर्जामंत्री नितीन राऊत)

बरेच लोक आर्चरचे हे ट्विट टॅग करून त्याला भविष्यसूचक व्यक्ती असल्याचे म्हणत आहेत, तर आर्चरच्या या ट्विटवर बरेच यूजर्स मजाही घेत आहेत. 12 ऑक्टोबर, सकाळपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या अनेक भागात तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज खंडितमुळे मुंबईत धावणाऱ्या लोकल गाडय़ांवरही परिमाण झाला असून लोकांना आणखीन अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पाहा आर्चरचे ट्विट: 

आर्चर एक ज्योतिषी आहे!

जोफ्रा ते मुंबईकर:

ले मुंबईकर

काही भागांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर

दुसरीकडे, आर्चर सध्या युएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सत्रात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करीत आहे. या स्पर्धेत आर्चरची आजवरची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. चेंडू आणि फलंदाजीमुळे तो राजस्थानसाठी प्रभावी ठरला आहे. आर्चरने आयपीएल 2020 मध्ये खेळल्या गेलेल्या 7 सामन्यात 9 गडी बाद केले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now