Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्स लाइनमध्ये 'हे' 4 परदेशी खेळाडू संपूर्ण सीझन करू शकतात पैसा वसूल कामगिरी!
आयपीएलच्या सुरुवातीला काही दिवस शिल्लक असताना लसिथ मलिंगाच्या रूपात गतविजेता मुंबईला मोठा धक्का बसला. मलिंगाने माघार घेतली असली तरी मुंबईला प्लेयिंग इलेव्हनमध्ये श्रीलंकन गोलंदाजांचे स्थान घेण्यासाठी पुरेसे खेळाडू उपलब्ध आहेत आणि अखेर कोणाला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार असेल.
इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) विक्रमी चार वेळा विजेतेपद जिंकलेले मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) सलामीच्या सामन्याने आयपीएलच्या (IPL) 13 व्या मोसमाच्या सुरुवात करतील. हा सामना अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये (Sheikh Zayed Cricket Stadium) खेळला जाईल. रोहित शर्मा, आयपीएल इतिहासातील आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. पण, आयपीएलच्या सुरुवातीला काही दिवस शिल्लक असताना लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) रूपात गतविजेता मुंबईला मोठा धक्का बसला. मलिंगाने कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या इच्छेने यंदा आयपीएलमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा सर्वात अनुभवी आणि मुख्य गोलंदाज मलिंगाने माघार घेतली असली तरी मुंबईला प्लेयिंग इलेव्हनमध्ये श्रीलंकन गोलंदाजांचे स्थान घेण्यासाठी पुरेसे खेळाडू उपलब्ध आहेत, जे पैसा वसूल कामगिरी करू शकतात आणि टीमला विजय मिळवून देऊ शकतात. मात्र,अखेर कोणाला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार असेल. (Most Dangerous Team In IPL: इंडियन प्रीमियर लीग 2020 विजेतेपदासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आहे मजबूत दावेदार, पाहा ही आकडेवारी)
लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्स ही सर्वात यशस्वी टीम आहे आणि मागील अनेक वर्षाच्या यशात सामील झालेले खेळाडू अद्यापही टीमचा अविभाज्य भाग आहेत. तथापि, आजवर स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाने माघार घेतल्यामुळे मुंबईला त्यांच्या लाइन-अपशी झगडावे लागणार आहे आणि प्रत्येक संघाला केवळ चार विदेशी खेळाडू ठेवण्याची मुभा देण्यात आली असल्याने त्यांच्यासाठी अवघड परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे, आयपीएल 2020 सुरू होण्यापूर्वी आपण चार असे परदेशी खेळाडूंकडे नजर टाकू जे मुंबई इंडियन्सकडून यंदा नियमित सामने खेळू शकतात.
1. क्विंटन डी कॉक
गेल्या सत्रात डी कॉकने मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला होता आणि चौथे जेतेपद मिळवणाऱ्या क्लबसाठी सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होता. त्याने चॅम्पियन्स टीमसाठी 529 धावा केल्या आणि पुन्हा एकदा विक्रम चॅम्पियन्ससाठी डावाची सुरुवात करेल.
2. कीरोन पोलार्ड
2010 मध्ये क्लबमध्ये सामील झाल्यापासून वेस्ट इंडीयन मुंबई इंडियन्स संघात नियमित वैशिष्ट्य ठरले आहे. गेल्या मोसमात फॉर्म परत मिळाल्यानंतर 33-वर्षीय विंडीज फलंदाजाने 150 स्ट्राइक रेटने धावा केल्या. पोलार्डने फ्रँचायझीसह चार विजेतेपद जिंकले आहेत. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूने मुंबईत आपले स्थान कायम राखले तर यात आश्चर्य वाटणार नाही.
3. ट्रेंट बोल्ट
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज सध्याच्या क्षणी जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो आणि मलिंगाच्या जागी त्याचा समावेश होण्याची अपेक्षा आहे. आयपीएलमध्येही बोल्टने सभ्य कामगिरी बजावली आहे. त्याने 33 सामन्यात 38 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा वेगवान गोलंदाजीचा अनुभव मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
4. क्रिस लिन
लिलावा दरम्यान मुंबई इंडियन्सने या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला विकत घेतले. व्हाइट बॉल क्रिकेटमधील सर्वात विनाशकारी फलंदाज म्हणून लिनने स्वत:ची ओळख निर्माण केली असून तो मुंबईच्या फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असेल. त्याचा अनुभव आणि आयपीएलमधील रेकॉर्ड चॅम्पियन्ससाठी उपयोगी ठरेल.
हे चारही खेळाडू संपूर्ण हंगामात मुंबई संघात असण्याची अपेक्षा आहे पण दुखापतीमुळे गोष्टी बदलू शकतात. मुंबई इंडियन्सकडे मिचेल मॅक्लेनाघन, नॅथन कुल्टर-नाईल, जेम्स पॅटिन्सन आणि शेरफेन रदरफोर्ड सारखे गोलंदाज देखील आहेत जे गरज पडल्यास प्लेयिंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)